शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कर्जाच्या आमिषाने ४३.७४ लाखांची फसवणूक, शिवाजी पेठेतील महिलेस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:29 IST

जयसिंगपुरातील नितीन जंगम यांना गंडा 

कोल्हापूर : व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासह बँकांमधील तारण लिलावाचे सोने आणि कार कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने नितीन दिलीप जंगम (वय ४०, रा. पुजारी गल्ली, जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांची ४३ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार जून ते डिसेंबर २०२४ या काळात घडला. जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्नेहा संजय नारकर (३५, रा. संध्यामठ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) या महिलेला रविवारी (दि. १) अटक केली.लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन जंगम हे जयसिंगपुरातील सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी आहेत. त्यांचा इचलकरंजीत ब्युटी स्पाचा व्यवसाय आहे. व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती. जून २०२४ मध्ये स्पामध्ये येणारी महिला स्नेहा नारकर हिच्याशी त्यांची ओळख झाली. बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून कमी व्याज दरात कर्ज मिळवून देण्याचे काम करीत असल्याचे सांगत तिने जंगम यांचा विश्वास संपादन केला.एका राष्ट्रीयीकृत बँकेतून दीड कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज मिळवून देण्याचे आमिष तिने दाखवले, तसेच बँकांमध्ये तारण ठेवलेले कर्ज आणि कार लिलावातून कमी किमतीत मिळवून देऊ असे सांगितले. यासाठी प्रोसेसिंग फी आणि स्टँप फी म्हणून वेळोवेळी पैशांची मागणी केली. शासकीय सवलत आणि अनुदानातून व्याजात ६० टक्के सवलत देण्याचेही आमिष दाखवले.सात महिन्यांत ऑनलाइन, आरटीजीएस, एनईएफटीसह नारकर यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष रक्कम भरूनही कर्ज मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे जंगम यांच्या लक्षात आले. त्यांनी पैसे परत मागितले. मात्र, नारकर दाम्पत्याने पैसे परत देण्यास नकार दिला. त्यानंतर जंगम यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी नारकर हिला अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.कर्ज काढून पैसे दिलेजंगम यांनी स्वत:कडील आणि दोन मित्रांकडील रक्कम नारकर हिला दिली. त्यानंतरही पैशांची मागणी सुरूच राहिल्याने त्यांनी आईच्या नावे पतसंस्थेतून २२ लाखांचे कर्ज काढून ती रक्कम नारकर हिला दिली. २२ जुलै ते २० डिसेंबर २०२४ या काळात त्यांनी २९ ट्रान्जेक्शनद्वारे ४३ लाख ७४ हजार रुपये दिले.

व्यवसायावर परिणामजंगम यांचा इचलकरंजीतील व्यवसाय चांगला चालला होता. दीड कोटीचे कर्ज काढून त्यांना स्पाच्या शाखा सुरू करायच्या होत्या; पण कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात जंगम कर्जबाजारी झाल्याने त्यांच्या जुन्या व्यवसायावरही परिणाम झाला. या गुन्ह्यात स्नेहा नारकर हिला मदत करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस