शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भरचौकात शस्त्रे नाचवली, पोलिसांनी त्यांची जिरवली; आठ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:03 IST

हसूर दुमाला येथील प्रकार, एका अल्पवयीन मुलाचा समावेश

कोल्हापूर : सोशल मीडियात ‘हवा’ निर्माण करण्याच्या उद्देशाने हसूर दुमाला (ता. करवीर) येथील छत्रपती शिवाजी चौकात १० ते १२ तरुणांनी शस्त्रे नाचवून व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करून काही काळ हवा केली. पण, या स्टंटबद्दल गुन्हा दाखल होताच तरुणांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली. शनिवारी (दि. २६) रात्री आठच्या सुमारास घडलेल्या प्रकारात करवीर पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.गावातील छत्रपती शिवाजी चौकात शनिवारी रात्री एक कार आणि काही दुचाकी पोहोचल्या. भर चौकात एकत्र आलेल्या तरुणांनी त्यांच्याकडील तलवारी, कोयते, चाकू, लोखंडी पाइप, काठ्या नाचवत घोषणाबाजी केली. सुमारे अर्धा तास त्यांचे फोटो सेशन आणि चित्रीकरण सुरू होते. हा सर्व प्रकार समजताच करवीर पोलिस हसूर दुमाला येथे पोहोचले.मात्र, तोपर्यंत तरुण निघून गेले होते. माहिती घेतली असता आसपासच्या गावांमधून आलेल्या काही तरुणांनी चौकात शस्त्रे नाचवत स्टंट केल्याचे पोलिसांना समजले. याबाबत पोलिस पाटील साताप्पा ज्ञानदेव परीट (वय ६०, रा. कुंभार गल्ली, हसूर दुमाला) यांनी फिर्याद दिली.त्यानुसार पोलिसांनी नऊ जणांवर सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचा गैरवापर करणे, दहशत माजवणे, हुल्लडबाजी करण्याचा गुन्हा दाखल करून त्यांना रविवारी अटक केली. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. न्यायालयात हजर केले असता, संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. पोलिसांनी गुन्ह्यातील कार आणि शस्त्रे जप्त केली.यांना झाली अटकराहुल विष्णू पोवार (वय ३०, रा. हसूर दुमाला), अक्षय शेखर बागडी (वय २८, रा. कसबा बावडा, कोल्हापूर), आदित्य बजरंग गोसावी (वय २०, रा. शिये, ता. करवीर), करण राजेश फाळके (वय २०), रोहन विजय गायकवाड (दोघे रा. कनाननगर, कोल्हापूर), ऋतुराज कृष्णात चौगुले (वय २२, रा. कुरुकली, ता. करवीर), नागेश पाटील आणि सूरज राजेश वरुटे (वय ४३ दोघे रा. म्हालसवडे, ता. करवीर) यांना अटक झाली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली. अल्पवयीन संशयिताला बालसुधारगृहात पाठवण्यात आले.

व्हिडीओ केला व्हायरलभर चौकात शस्त्रे नाचवण्याचे व्हिडीओ तयार करून ते तरुणांनी सोशल मीडियात व्हायरल केले. चिथावणी देणारे व्हिडीओ सोशल मीडियातून डिलिट केले जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस