शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिये फाटा येथे दुचाकीची पादचाऱ्याला धडक, दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:11 IST

भीषण अपघतात दुचाकी सुमारे शंभर फूट फरफटत गेली होती

शिये: पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील शिये ता. करवीर फाटा येथे दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी  सचिन ऊर्फ पोपट  कुमार चौगले  (वय ४० रा. किणी ता. हातकणंगले ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार र्सोरभ संजय साळुंखे (३०, रा. हरिपुजा पुनम नगर कोल्हापूर) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारच्या सुमारास हॉटेल दुर्गामाता समोर हा अपघात झाला. या भीषण अपघतात दुचाकी सुमारे शंभर फूट फरफटत गेली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.याबाबत घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन चौगले हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीत कामाला होता. रविवारी दुपारची शिप्ट असल्याने ते कामावर जाण्यासाठी  शिये फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग ओलाडत होता. त्याचवेळी कोल्हापूरहुन सादळे  मादळेकडे जाणाऱ्या सौरभ साळुंखे याच्या भरधाव दुचाकीने सचिन चौगले यांना जोराची धडक झाली. या धडकेत सचिन याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन विवाहीत बहिणी असा परिवार आहे. सौरभ साळुंखे हा सिव्हिल इंजीनियर असून त्यांच्या वडीलांचा  शिरोली औद्योगिक वसाहतीमधील हनुमाननगर येथे  ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. त्यांचा सादळे मादळे येथे फार्म हाऊस आहे. त्याचे नुतनीकरणाचे काम चालू असल्याने सौरभ हा कोल्हापूरहुन सादळे मादळेकडे मोटारसायकलवरून निघाला होता. या अपघातात सौरभ  साळुंखे हा गंभीर जखमी झाला . त्याला उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू