कोल्हापूर : अंबाबाईचे भक्त संपूर्ण देशभर आहेत. तिच्या भक्तिपोटी एका पालकाने आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीला चक्क अंबाबाई बनवले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. अंबाबाईची साडी, तिचा टोप, गळ्यात माळा, हळदी, कुंकू, गंध असे सजविल्याने या चिमुकलीच्या गोंडस रूपाने सोशल मीडियावर चांगलीच भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ अनेकांना आवडला असला, तरी एखाद्या लहान बाळाला असे रूप देऊन पालक काय साधत आहेत, असा सवालही नेटकऱ्यांनी विचारला आहे. असा साज चढवून लहान बाळाला कशाला त्रास देता, या शब्दात अनेकांनी यावर नाराजीही व्यक्त केली आहे. तीन महिन्यांच्या बाळाला किती तो त्रास दिला, किती वेळ बसवलं, तिचा पाठीचा कणा काय म्हणत असेल. नाजूक त्वचेवर नको नको ते रासायनिक रंग लावले, अशा तिखट प्रतिक्रियांचा या व्हिडीओवर पाऊस पडला आहे. हे असं काही पाहिलं की मनाला खूप वेदना होतात, ही लोकं लहान मुलांनाही साेडत नाहीत, असे म्हणत नेटकऱ्यांनी पोरखेळ नको, या शब्दांत सुनावले आहे.
Web Summary : A Kolhapur family dressed their three-month-old child as Goddess Ambabai, sparking a viral video. While some admired the adorable transformation, others criticized the parents for potentially causing discomfort to the infant with heavy attire and makeup.
Web Summary : कोल्हापुर के एक परिवार ने अपनी तीन महीने की बच्ची को देवी अंबाबाई के रूप में तैयार किया, जिससे एक वीडियो वायरल हो गया। कुछ लोगों ने इस मनमोहक परिवर्तन की प्रशंसा की, तो कुछ ने माता-पिता द्वारा शिशु को भारी पोशाक और श्रृंगार से संभावित रूप से असहज करने के लिए आलोचना की।