शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: विद्यार्थिनींशी गैरकृत्य करणारा शिक्षक अटकेत, खांद्यावर, खिशात हात घालून करायचा अश्लील चाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:56 IST

समुपदेशन करण्यासाठी आलेल्या समुपदेशक गीता हासूरकर यांनी मुलींना विश्वासात घेऊन माहिती घेताना हा प्रकार उघडकीस आला

तुरंबे : राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाकडून मुलींच्या असाह्यतेचा फायदा घेत चुकीचे वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संस्थेने तत्काळ त्या शिक्षकाची बदली केली. तर आज या शिक्षकास पोलिसांनी अटक केली. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

विजयकुमार परशुराम बागडी (वय-५२ मुळ गाव सोळांकूर, सध्या रा. फुलेवाडी कोल्हापूर) असे अटक केलेल्या या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर काही तासातच पोलिसांनी संशयित शिक्षकाला अटक केली.नववी आणि दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना त्याने त्रास दिल्याचे समोर आले. मात्र, हा प्रकार एक महिन्यापूर्वी घडला आहे. समुपदेशन करण्यासाठी आलेल्या समुपदेशक गीता हासूरकर यांनी मुलींना विश्वासात घेऊन माहिती घेताना हा प्रकार उघडकीस आला.शाळेतील ९ वी आणि १० वीच्या वर्गातील मुलींना हा शिक्षक संबंधित विद्यार्थिनींच्या खांद्यावर हात ठेवणे, खिशात हात घालणे असा गैरप्रकार करत होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याने गैरकृत्य केल्याच्या घटनेची चर्चा ग्रामस्थांच्यात होती. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामस्थांनी या संस्थेच्या कार्यालयात धाव घेतली. संस्थेने तत्काळ त्या शिक्षकाची बदली केली. शिक्षकाची तत्काळ बदलीकाही ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने संबंधित शिक्षकाची बदली करून घडल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. संबंधित शिक्षकाची सध्या सातारा जिल्ह्यात बदली केली आहे, अशी माहिती पोलिस पाटील श्रीपती पाटील यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारी