सेनापती कापशी: सेनापती कापशी (ता.कागल) येथील एका विद्यालयातील सहाय्यक शिक्षकाने मुलींची छेड काढल्याची घटना समोर आली. संतप्त पालक व जमावाने संबंधित शिक्षकास बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यानच त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, सेनापती कापशी येथील विद्यालयात संबंधित शिक्षक गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. यापूर्वीही त्याने मुरगुड येथील विद्यालयात असाच प्रकार केला होता. त्यावेळी सुद्धा तेथील पालक व जमावाने बेदम त्याला चोप देऊन मुरगुड शहरातून धिंड काढली होती. तरी देखील या शिक्षकाने कोणताही धडा न घेता पुन्हा तोच प्रकार पुढे सुरू ठेवला. अन् पुन्हा एकदा मुलींची छेड काढली. त्यामुळे संतप्त जमावाने त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
Kolhapur: शिक्षकानेच विद्यार्थीनींची छेड काढली, संतप्त जमावाने दिला बेदम चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:33 IST