शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या तणावातून शिरोळमधील विद्यार्थिनीने संपविले जीवन; तालुक्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:40 IST

शिरोळ/कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यात मंगळवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्या. परीक्षेच्या तणावातून नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या ...

शिरोळ/कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यात मंगळवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्या. परीक्षेच्या तणावातून नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमृता संतोष आंबेकर (वय १९, रा. इंदिरानगर, शिरोळ) असे तिचे नाव असून, या घटनेची नोंद शिरोळ पोलिस ठाण्यात झाली आहे. अमृता ही जयसिंगपूर येथील एका कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. बुधवार (दि. १२)पासून तिची परीक्षा सुरू होणार होती. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. वडील संतोष जनार्दन आंबेकर यांनी तत्काळ तिला वैद्यकीय मदत मिळविण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत उशीर झाला होता. तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.तेरवाड (ता. शिरोळ) येथील सुखदेव श्रीपती मगदूम (४२) यांनी गट नंबर २६३ मधील शेताच्या बांधावर असलेल्या उंबराच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मंगळवारी (दि. ११) सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रावसो बल्लू मगदूम यांनी या घटनेची वर्दी येथील पोलिसांत दिली आहे. तिसऱ्या घटनेत कुरुंदवाड येथील विद्यासागर राजगोंडा पाटील (३८) याने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची वर्दी सचिन सातगोंडा पाटील यांनी येथील पोलिसांत दिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस