Kolhapur: शाहू नाक्यावर भरधाव कारची दोन वाहनांना धडक; तिघे जखमी
By भीमगोंड देसाई | Updated: February 25, 2025 18:59 IST2025-02-25T18:58:10+5:302025-02-25T18:59:00+5:30
कोल्हापूर : शाहू टोलनाक्याजवळ मंगळवारी रात्री एक वाजता भरधाव कार चालवून रस्त्याकडेला थांबलेल्या दोन वाहनांना धडकून तिघांना जखमी केले. ...

Kolhapur: शाहू नाक्यावर भरधाव कारची दोन वाहनांना धडक; तिघे जखमी
कोल्हापूर : शाहू टोलनाक्याजवळ मंगळवारी रात्री एक वाजता भरधाव कार चालवून रस्त्याकडेला थांबलेल्या दोन वाहनांना धडकून तिघांना जखमी केले. याप्रकरणी कारचालक सिद्धांत सुनील पोवार (वय २७, रा. जाधव पार्क, रामानंदनगर, कोल्हापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये चालक सिद्धांत आणि करण जयसिंग भंडारी, वैभव भाले हे तिघेजण जखमी झाले.
पोलिसांनी सांगितले की, सिद्धांत पोवार याने आपल्याकडील वाहन भरधाव चालवून बाजीराव दत्तू ओंबासे (वय ५६, रा. चिंतामणी कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्या चारचाकी वाहनास पाठीमागून धडकली. त्यामध्ये दोन्ही कारचे नुकसान झाले आहे.