शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मद्यधुंद कार चालकाची ७ वाहनांना धडक, एकजण जागीच ठार; एअरबॅग उघडल्याने चालक बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 11:49 IST

बघ्यांवर सौम्य लाठीमार करण्याची वेळ 

कोल्हापूर : येथील दसरा चौक ते कसबा बावडा रोडवर महावीर कॉलेजसमोर ‘भारत सरकार, जीएसटी’ असा फलक असलेल्या भरधाव अलिशान कारने बुधवारी एकास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वरूण रवी कोरडे (वय २२, रा. उदयसिंगनगर, महावीर कॉलेजजवळ, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. अपघात चौघे जखमी झाले. 

भरधाव कारने दोन कारसह सात दुचाकींनाही जोरात धडक दिली. त्यानंतर कार दोन ते तीनवेळा उलटली. रात्री साडेदहा वाजता हा अपघात घडला. दरम्यान, अपघात पाहण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणात येत नसल्याने शेवटी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, एमएच १० ईए ९४९५ या नंबरची आणि भारत सरकार, जीएसटी विभाग असे लिहिलेली कार बावड्याकडून भरधाव वेगाने शहराच्या दिशेने येत होती. प्रचंड वेगात असलेल्या कारने पहिल्यांदा महावीर कॉलेजसमोर बॅडमिंटन खेळून घरी जाणारा वरून काेरडे या दुचाकीस्वाराला उडवून सुमारे दहा फूट फरफटत नेले. महावीर कॉलेजच्या बाजूकडील फुटपाथलगत लावलेल्या दुचाकींना धडकत समोरून येणाऱ्या कारला जोरात त्याने धडक दिली. त्यानंतर त्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारलाही उडवले. यामध्ये एकूण तीन कारचे मोठे नुकसान झाले.दरम्यान, धडक बसल्यानंतर जोरात आवाज आला. त्यावेळी आजूबाजूसह बघ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धडक दिलेल्या कारच्या चालकास चांगलाच चोप दिला. जमावाकडून त्याला पोलिसांनी सोडवून घेत ताब्यात घेतले.

रक्ताचा सडा, मृतदेह छिन्नविछीन्नसुसाटपणे चिरडल्याने वरूनच्या मृतदेह छिन्नविछीन्न झाला होता. दुचाकीचा चुरा झाला होता. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. शव सीपीआरमध्ये नेल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याने रक्त धुवून काढले.

चालक मदधुंद असल्याची शक्यताधडक दिलेल्या कारचा चालक मदधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये बाटल्या आणि चकना मिळाला. धडकलेल्या कारमधील एअरबॅग उघडल्याने चालक बचावला.

कसबा बावड्यातही धडकत्या कार चालकाने कसबा बावड्यातील काही दुचाकीला धडक दिल्याचे सांगण्यात आले. यावरून तो तेथूनच सुसाटपणे आला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

जोतिबा दर्शनाहून घरी जातानाच..

संजय गावडे हे मुलग्यासह कुटुंबातील चारजण जोतिबा दर्शनास गेले होते. दर्शन घेवून परतत असताना महावीर कॉलेजसमोर भरधाव कारने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. कारमधील गावडे यांचा मुलगा जखमी झाला. सुदैवाने कारमधील इतर कोणास फारशी दुखापत झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.

वाहतूक ठप्पअपघातामुळे बघ्यांची गर्दी आणि धडक दिलेली कार रस्त्यात असल्याने रस्त्यावरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवताना आणि गर्दीतून घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांची तारांबळ उडाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू