अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 04:10 PM2022-07-10T16:10:58+5:302022-07-10T16:11:28+5:30

चव्हाण यांचे वडील आजारी असल्याने, ते  सुट्टी घेऊन गावी  आले होते. गुरुवारी दिनांक ७ रोजी वडिलांना पाहण्यासाठी जयसिंगपूर येथे गेले असता शिरोळ जयसिंगपूर रस्त्यावर अपघातात ते जखमी झाले होते.

A soldier who was seriously injured in the accident died during treatment in kolhapur | अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

googlenewsNext

कोल्हापूर/दत्तवाड - सैनिक टाकळी ता शिरोळ येथील जवान दिगंबर कृष्णाजी चव्हाण( वय २५ ) कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले  त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चव्हाण यांचे वडील आजारी असल्याने, ते  सुट्टी घेऊन गावी  आले होते. गुरुवारी दिनांक ७ रोजी वडिलांना पाहण्यासाठी जयसिंगपूर येथे गेले असता शिरोळ जयसिंगपूर रस्त्यावर अपघातात ते जखमी झाले होते. प्रथम त्यांना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण ते गंभीर असल्याने त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यानंतर त्याचे पार्थिव सैनिक टाकळी येथे आणण्यात आले. बेळगावी येथील आर्मी पथकाकडून मानवंदना देऊन शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार व अधिकारी उपस्थित होते. दिगंबर कृष्णाजी चव्हाण यांच्या मागे आई, वडील, तीन बहिणी, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: A soldier who was seriously injured in the accident died during treatment in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.