शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: गर्भवती पत्नीचा छळ, प्रेम विवाहानंतरही मागितला १० लाखांचा हुंडा; पतीवर गुन्हा

By उद्धव गोडसे | Updated: June 5, 2025 17:05 IST

तू गर्भपात कर. माझ्यासोबत राहू नको. माहेरी निघून जा. लग्नात तुझ्या आई-वडिलांनी काही दिले नाही. इथे राहायचे असेल तर १० लाखांचा हुंडा घेऊन ये,' असे म्हणत तो त्रास देत होता

उद्धव गोडसेकोल्हापूर : पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच कोल्हापुरातील वरणगे पाडळी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमविवाहानंतर सहा महिन्यांत १० लाखांच्या हुंड्याची मागणी करून गर्भवती पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला. याबाबत पीडित महिलेने बुधवारी (दि. ४) करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रोहित अर्जुन दुधाणे (रा. मधली गल्ली, वरणगे पाडळी) याच्यावर गुन्हा दाखल केला.करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सिंगचे शिक्षण घेताना पीडित तरुणीची रोहित दुधाणे याच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन मे २०२४ मध्ये दोघांचे लग्न झाले. ऑक्टोबर २०२४ मध्ये पत्नीची गर्भधारणा झाल्यापासून रोहितने तिचा छळ सुरू केला. 'मला सध्या मूल नको आहे. तू गर्भपात कर. माझ्यासोबत राहू नको. माहेरी निघून जा. लग्नात तुझ्या आई-वडिलांनी काही दिले नाही. इथे राहायचे असेल तर १० लाखांचा हुंडा घेऊन ये,' असे म्हणत तो त्रास देत होता. पोटावर लाथा मारून ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती.

वारंवार होणा-या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रोहित दुधाणे याचा शोध सुरू असून, त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.

लॉजवर रंगेहाथ सापडलारोहित दुधाणे याचे एका तरुणीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तीन दिवसांपूर्वी तो हणबरवाडी (ता. करवीर) येथे एका लॉजमध्ये महिलेसह रंगेहाथ सापडल्याची माहिती पीडितेच्या नातेवाईकांनी दिली. याबाबत इस्पुर्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे