कोल्हापूरच्या शिवसैनिकाने रक्ताने लिहिलं पत्र, उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 00:43 IST2022-07-19T21:36:07+5:302022-07-20T00:43:08+5:30

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकाने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे

A Shiv Sainik of Kolhapur wrote a letter in blood and supported Uddhav Thackeray | कोल्हापूरच्या शिवसैनिकाने रक्ताने लिहिलं पत्र, उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा 

कोल्हापूरच्या शिवसैनिकाने रक्ताने लिहिलं पत्र, उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा 

सतिश पाटील

शिरोली : टोप (ता.हातकंगले) येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकाने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे पत्र लिहून पाठिंबा दिला आहे. रक्ताने लिहिलेलं पत्र शिवसैनिकाने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्याकडे दिलं आहे. हे पत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. या शिवसैनिकांच्या पत्राची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

शिवसेनेतील ४० आमदार फुटून गेल्याने झालेल्या उद्भवलेली परिस्थिती चिंताजनक आहे.तरी ही सच्चे  शिवसैनिक मात्र शिवसेनेतच असल्याचे चित्र दिसत आहे. टोप मधील सुरज पाटील हा कट्टर शिवसैनिक आहे.किती ही आमदार खासदार जाऊदेत आम्ही पुन्हा नव्याने शिवसेना उभी करु गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे. आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक आहोत आणि प्रामाणिक राहणार असे ही सुरज पाटील म्हणाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, मातोश्रीवरील शब्द शिरसावंद्य मानून जीवाची सुद्धा काळजी न करणारा निष्ठावंत शिवसैनिक आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदीत्य ठाकरे यांनी पुन्हा निष्ठावंत शिवसैनिकांशी बैठकांचा धडाका लावला आहे. ते सातत्याने दिलासा देत आहेत.  कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्याशी फोनवरुन संपर्क करुन दिला. असे कट्टर शिवसैनिकच शिवसेनेची ताकद असल्याचे ते म्हणाले. तसेच हे प्रतिज्ञापत्र पुढे पाठवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकाने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. स्वत:च्या रक्ताने लिहिलेलं पत्र त्या शिवसैनिकाने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना दिलं आहे. त्यामुळे या शिवसैनिकाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या वेळी उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, तानाजी पाटील,राजू कोळी व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: A Shiv Sainik of Kolhapur wrote a letter in blood and supported Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.