इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारी मागणी झाली आहे. त्यात महायुतीसाठी घटक पक्षांसोबतच्या आकड्यांचाही मेळ बसेना. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची सांगलीत जाऊन भेट घेतली. इचलकरंजीतील उमेदवारी आणि घटक पक्षांच्या प्रश्नांवर चर्चा केली. त्यांच्या माध्यमातून अन्य पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर पुढील घोषणा होणार आहेत.पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाकडे मोठ्या संख्येने उमेदवारी मागणी झाली आहे. त्यातून योग्य उमेदवार निश्चित करताना नाकीनऊ येत आहे. बंडखोरी होऊ नये, यासाठीही काळजी घ्यावी लागत आहे. त्यानुसार चाचपणी सुरू असून, त्याची यादी व उमेदवारांबाबतची चर्चा करण्यासाठी त्याचबरोबर महायुतीसंदर्भात घटक पक्षांकडून मागितलेल्या जागा याबाबत चर्चा करण्यासाठी आमदार आवाडे, हाळवणकर आणि प्रकाश आवाडे असे तिघेजण सांगली येथे जाऊन सांगलीचे पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये पुढील निर्णय घेण्यासंदर्भात अन्य घटक पक्षांच्या प्रमुखांसोबत बोलणी झाल्यानंतर पुढे आकडे निश्चित होतील.राष्ट्रवादीबरोबर तिढाराष्ट्रवादी अजित पवार गटाचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याबद्दल यापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मार्ग निघाला नव्हता. त्यांनी ठराविक जागांवर महायुती, तर उर्वरित जागांवर मैत्रीपूर्ण लढतचा निर्णय दिला होता. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार हे लक्ष घालत असल्याने त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतरच हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
Web Summary : BJP faces high demand for Ichalkaranji election tickets. Allies negotiations continue. Patil met with leaders to discuss seat allocation. NCP deadlock persists, awaiting Ajit Pawar's decision after prior talks.
Web Summary : इचलकरंजी चुनाव के लिए बीजेपी में टिकट की भारी मांग है। सहयोगियों के साथ बातचीत जारी है। पाटिल ने सीट आवंटन पर चर्चा के लिए नेताओं से मुलाकात की। एनसीपी के साथ गतिरोध जारी, अजित पवार के फैसले का इंतजार।