शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पोलिसाचा हॉटेलमध्ये दारू पिऊन धिंगाणा; मालकास मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 16:51 IST

शिवाजी सावंत  गारगोटी: पिंपळगांव परिसरातील एका हॉटेलमध्ये भुदरगड पोलिस ठाण्याचा पोलिस कर्मचारी तानाजी रामचंद्र विचारे हा दारूच्या नशेत हॉटेल ...

शिवाजी सावंत गारगोटी: पिंपळगांव परिसरातील एका हॉटेलमध्ये भुदरगड पोलिस ठाण्याचा पोलिस कर्मचारी तानाजी रामचंद्र विचारे हा दारूच्या नशेत हॉटेल चालकाला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गारगोटी गडहिंग्लज महामार्गावरील पिंपळगांव येथे एक हॉटेल आहे. या ठिकाणी भुदरगड पोलिस ठाण्याचा कर्मचारी तानाजी विचारे हा काल, बुधवारी दुपारच्या सुमारास जेवण्यासाठी गेला होता. प्रत्येकवेळी तो त्या हॉटेलात मुजोरी करीत असल्याची चर्चा सुरू आहे. पण हॉटेल चालक त्याच्याकडे पोलिस असल्याने दुर्लक्ष करत होते. पण काल, बुधवारी दुपारी मद्यधुंद अवस्थेतील या पोलिसाने कहर केला.हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी सर्व्हिस चांगली दिली नसल्याने त्याचा इगो दुखावला गेला. या रागातून त्याने पैसे देण्यास नकार दिला. चालकाने यांबाबत विचारताच चक्क त्यालाच मारहाण सुरू केली. त्याची ही दादागिरी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात टिपली जात असल्याचे भान त्याला नव्हते.पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या या मग्रूर पोलिसावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी सर्व सीसीटिव्ही फुटेज मागवून घेतले. पंचनामा करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत गुरुवारी संध्याकाळी हालचाली सुरू झाल्या आहेत."सदरक्षणाय खलनिग्रहणाय"असे ब्रीदवाक्य असलेल्या पोलिस खात्यातील काही कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीने संपूर्ण खातेच बदनाम होत आहे.अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर संपूर्ण तालुक्याची सुरक्षा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नाहक बदनामीची नामुष्की पत्करावी लागत आहे. दरम्यान याबाबत पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,तानाजी विचारे यांनी केलेली गैरकृत्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस