शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लग्न ठरले होते.. दिवाळीनंतर बार उडवायचा होता; पण, तत्पूर्वीच पुण्यात बावड्याच्या पोलिसाने जीवन संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:51 IST

कारण अद्याप अस्पष्ट

कसबा बावडा : लग्न ठरले होते.. दिवाळीनंतर बार उडवायचा होता; पण लग्नाचा बार उडायच्या आतच त्याने पुण्यात गळफास घेऊन या जगाचा कायमचा निरोप घेतला. स्वरूप विष्णू जाधव (वय २८, रा. भगवा चौक, मराठा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.मंगळवारी सकाळी ७ वाजता त्यांच्यावर बावडा स्मशानभूमीत पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देऊन अंत्यसंस्कार केले. व्यायाम आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेल्या स्वरूप २०२३ साली पुणे पोलिस दलात भरती झाले. मुख्यालयाच्या शेजारीच असलेल्या स्वारगेट पोलिस लाइनमध्ये ते राहत होते. रूममधील खिडकीच्या अँगलला टॉवेलच्या साह्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.सकाळी त्यांचा मृतदेह बावडा येथील मराठा कॉलनी येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला. दरम्यान, स्वरूप यांच्या निधनाचे वृत्त समजतात त्यांच्या मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. सकाळी सात वाजता त्यांच्यावर कसबा बावडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.स्वरूप मित्रांना म्हणायचे माझे आता लग्न ठरलेय. रजा शिल्लक पाहिजेत. दिवाळीनंतर मी लग्न करणार आहे. तुम्ही पण मुली बघा आणि लग्न करा, असे ते नेहमी मित्रांना म्हणायचे. असे त्यांच्या वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत पुढील तपास पुणे खडकवासला पोलिस करीत आहेत. स्वरूप यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी सकाळी आहे.

महिनाभरात पाच ते सात जणांच्या आत्महत्या !बावड्यात गेल्या महिना-दीड महिन्यात विविध कारणांनी पाच ते सात जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील अनेकांची आत्महत्येची कारणे समजलेली नाहीत. सतत तरुणांच्या आत्महत्या होत असल्याने बावडा हादरला आहे.