करंजफेण : 'देव तारी त्याला कोण मारी' म्हणीचा प्रत्यय पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील लव्हटे कुटुंबियांना आला. कोतोली येथील प्रवीण पांडुरंग लव्हटे यांचा सव्वा वर्षाचा श्रीवंश हा मुलगा घराच्या गॅलरीत खेळत होता. बहिणीची नजर चुकवून खाली डोकावला अन् गॅलरीतून खाली पडला. पण दैव बलवत्तर म्हणून श्रीवंशच्या डोक्याला किरकोळ दुखापत वगळता तो सुखरूप बचावला.लव्हटे यांची मुलगी कल्याणी गॅलरीत अभ्यास करत बसली होती आणि तिच्या शेजारी श्रीवंश खेळत होता. नजरेतून क्षणभर सुटलेले हे बाळ गॅलरी लगत ठेवलेल्या खुर्चीकडे गेले आणि त्यावर चढत असतानाच तोल जाऊन श्रीवंश खाली पडला. घराच्या आतून बाळ दिसेनासे होताच कल्याणी धावत बाहेर आली, तेवढ्यात तिला बाळ हवेतून खाली झेपावताना दिसले.घाबरलेल्या आवाजात तिने आरडाओरडा केला. घराच्या खाली काही लोक बसले होते. कल्याणीच्या किंकाळीने ते तत्काळ बाहेर धावले. बाळ खाली पडताना पाहून दीपक परीट यांनी धाव घेऊन चपळाईने श्रीवंशला झेलण्याचा प्रयत्न केला. पण झेल अपयशी ठरून श्रीवंश खाली गटारीवरील फरशीवर आदळला. मात्र डोक्यावर पडण्याऐवजी हातावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.दीपक परीट यांनी बाळाला उचलून घेतले. रुग्णालयात श्रीवंशचे एक्स-रे आणि स्कॅनिंगसह सर्व तपासण्या करण्यात आल्या. बाळाची तब्येत चांगली असल्याचे डाॅक्टरांनी सांगताच आई-वडिलांसह सर्व नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी तराळले.
Web Summary : A one-year-old boy fell from a balcony in Kotoli, Kolhapur, but miraculously survived with minor injuries. He slipped while playing, but a neighbor's attempt to catch him softened the impact, averting a major tragedy. Doctors confirmed the child's good health, bringing relief to the family.
Web Summary : कोल्हापुर के कोतोली में एक साल का बच्चा बालकनी से गिर गया, लेकिन चमत्कारिक रूप से मामूली चोटों के साथ बच गया। खेलते समय वह फिसल गया, लेकिन एक पड़ोसी द्वारा उसे पकड़ने के प्रयास से प्रभाव कम हो गया, जिससे एक बड़ी त्रासदी टल गई। डॉक्टरों ने बच्चे के अच्छे स्वास्थ्य की पुष्टि की, जिससे परिवार को राहत मिली।