शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलीस नेले पळवून, तरुणास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 11:59 IST

लग्नाचे आमिष दाखवून नेले पळवून

आजरा : इन्स्टाग्रामवरील ओळखीतून मासेवाडी ( ता. आजरा ) येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी कोणोलीपैकी असंडोली ( ता. राधानगरी ) येथील सूरज संभाजी सुतार ( वय २३ ) याला आजरा पोलिसांनी अटक केली आहे. पोस्को कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याला आज न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सूरज सुतार हा सुतारकाम करतो. त्याचे गेल्या आठ महिन्यांपासून इन्स्टाग्रामवर मासेवाडी येथील अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. या ओळखीतून आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला सूरजने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तिच्याशी गेले आठ दिवस शारीरिक संबंध ठेवले. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी आजरा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावरून आजरा पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले तर सूरजला अटक केली.अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर सूरज सुतार याच्याविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, सहायक फौजदार बिराप्पा कोचरगी, पोहेकाॅ सुनील म्हसवेकर, राजेश आंबुलकर, अमोल पाटील करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरInstagramइन्स्टाग्रामCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस