शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: प्रेमप्रकरणातून रंगेहाथ सापडला, लॉजिंगच्या दारात कौटुंबिक ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:31 IST

सागर शिंदे दिंडनेर्ली : कोल्हापूर - गारगोटी मार्गावरील हणबरवाडी (ता. करवीर) येथील एका लॉजमध्ये रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ...

सागर शिंदेदिंडनेर्ली : कोल्हापूर - गारगोटी मार्गावरील हणबरवाडी (ता. करवीर) येथील एका लॉजमध्ये रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक विवाहित तरुण अन्य एका महिलेला घेऊन भेटायला आला होता. काही वेळात तरुणाचे नातेवाईक आल्याने अनैतिक प्रकरण रंगेहाथ सापडले आणि लॉजिंगच्या दारातच कौटुंबिक ड्रामा रंगला.संबंधित तरुण लॉजिंगमधून शिवीगाळ करतच बाहेर आला. लॉजिंगच्या दारात हाणामारी झाली. या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची या हाणामारीमुळे नेमके प्रकरण काय झालंय, याची उत्सुकता वाढली होती.पाठलाग करत असल्याचा संशय घेऊन एका महिलेसह दोघांना मारहाण करून जखमी केल्याबद्दल वरणगे पाडळी येथील व्यक्ती व एका अनोळखी महिलेविरुद्ध इस्पूर्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, वरणगे पाडळी येथील युवक आपल्या पत्नीला कौटुंबिक कारणावरून वारंवार शिवीगाळ व मारहाण करून त्रास देत असल्यामुळे त्याला भेटून समजावून सांगण्यासाठी नातेवाईक कुटुंबीय प्रयत्न करत होते. रविवारी सायंकाळी हणबरवाडी येथील पत्नीच्या मामाला लॉजिंगच्या दारात जावयाची गाडी दिसली असता, नातेवाईकांनी युवकाला लॉजमधून बाहेर बोलावले.संबंधित युवक बाहेर येताच माझा पाठलाग करता काय, तुम्हाला सोडणार नाही, मी कोण आहे ते सांगतो, असे म्हणत शिवीगाळ करत नातेवाईकांना लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली. यावेळी त्या युवकासोबत आलेल्या महिलेनेदेखील मारहाणीत साथ दिली. युवकाने लाकडी बॅटनपट्टी नातेवाईक महिलेच्या डोक्यात मारून जखमी केले. याबाबत नातेवाईकांनी जावयाविरोधात फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील करत आहेत.दुसऱ्या घटनेची आठवणआठ ते दहा महिन्यांपूर्वी दिंडनेर्ली ते हणबरवाडी दरम्यान असणाऱ्या एका लॉजिंगच्या दारात बिद्री परिसरातील प्रेमीयुगुलाची मुलीकडच्या नातेवाईकांनी यथेच्छ धुलाई केली होती. पोलिसांत प्रकरण गेले होते, पण शेवटी तडजोडीने परस्पर मिटवले गेले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस