शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: डंपरची दुचाकीला धडक, पती-पत्नी ठार; देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 13:44 IST

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पूलाजवळ डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये पती-पत्नी ठार झाले. हा अपघात आज, ...

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पूलाजवळ डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये पती-पत्नी ठार झाले. हा अपघात आज, सोमवारी सकाळच्या सुमारास झाला. या दुर्घटनेत पत्नी सुनीता संजय वडिंगे (वय ५५) या जागीच ठार झाल्या, तर पती संजय सदाशिव वडिंगे (५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देवदर्शन करून परतताना या दाम्पत्यावर काळाने घाला घातला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलकरंजी प्रमुख होते. १५ दिवसांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. ते दररोज सकाळी पंचगंगा नदीकिनारी असलेल्या वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परतत असताना यशोदा पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला डंपर ने धडक दिली. अपघातात पत्नी सुनीता या जागीच ठार झाल्या. तर जखमी संजय यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. अपघातामुळे यशोदा पूलाजवळ वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मृत संजय वडिंगे यांचा मुलगा जेल पोलिस दलात कार्यरत आहे. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला असून पोलिसांनी डंपर जप्त करून गावाभाग पोलीस ठाण्यात आणला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू