शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

कोल्हापुरात बनावट नोटा तयार करणारी टोळी गजाआड, साडेचार लाखांच्या नोटांसह साडे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 16:34 IST

संशयितांनी कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपवल्याचा संशय

उद्धव गोडसेकोल्हापूर : बनावट नोटा तयार करून त्या बाजारात खपवणा-या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज, शनिवारी (दि. २१) अटक केली. चौघांच्या टोळीकडून ४ लाख ४५ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटांसह गुन्ह्यातील कार, प्रिंटर, संगणक, कागद असा १२ लाख ६२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मरळी फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी (दि. २०) ही कारवाई केली.बनावट नोटांसह काही संशयित कळे ते कोल्हापूर मार्गावर शुक्रवारी एका पांढ-या रंगाच्या कारमधून येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक शेषराज मोरे यांच्या पथकाने मरळी फाटा येथे पासळा रचून संशयित कार (एम.एच. ०९ डी.एक्स. ८८८८) अडवली. कारमधील संशयितांची अंगझडती घेताना त्यांच्याकडे बनावट नोटा आढळल्या.कारमधील संशयित चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (वय ३४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजित राजेंंद्र पवार (४०, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्विजय कृष्णा पाटील (२८, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांना तिघांना अटक केल्यानंतर संदीप बाळू कांबळे (वय ३८, रा. आंबेडकर नगर, कळे, ता. पन्हाळा) याला त्याच्या कळे येथील घरातून अटक करण्यात आली. यातील संदीप कांबळे हा टोळीचा सूत्रधार असून, तो कळे येथे एका ई-सेवा केंद्रात कामाला होता. संशयितांनी कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपवल्या असाव्यात, असा संशय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोरले यांनी व्यक्त केला आहे.

या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शेषराज मोरे यांच्यासह विजय गुरखे, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदुराव केसरे, श्रीकांत मोहिते, रणजित पाटील, दीपक घोरपडे, सोमराज पाटील, रफिक आवळकर, आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस