शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जुना वाद, इचलकरंजीत टोळक्याकडून बेदम मारहाण; चौघे जखमी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:46 IST

२ अल्पवयीनसह २२ जणांना अटक

इचलकरंजी : सूर्योदयनगर येथे जुन्या वादातून एका टोळक्याने धारदार शस्त्र व लाकडांनी चौघांना मारून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी २ अल्पवयीनसह २२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमींना उपचारासाठी सांगली व कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी सुशांत अर्जुन रानमाळे (वय २५, रा. इंदिरा कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे.सुशांत रानमाळे, नौशाद करीम मुजावर (२४, रा. स्वामी अपार्टमेंट), आयुब अहमद अत्तार (२२, रा.केटकाळेनगर) व सागर अमर शिकलगार (२०, रा. शिकलगार वसाहत) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सुशांत, नौशाद, आयुब आणि सागर हे चार मित्र सूर्योदयनगर जुन्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या कट्ट्यावर सोमवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास बोलत बसले होते. त्यावेळी जुन्या रागातून संशयित आरोपींनी येऊन धारदार शस्त्रे, दांडके आणि दगडाने बेदम मारहाण केली व तेथून पसार झाले. यामध्ये नौशाद व आयुब हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना आयजीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती अधिक गंभीर असल्याने सांगली व कोल्हापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर तातडीने धरपकड मोहीम राबवून दोन अल्पवयीनसह २२ जणांना अटक केली. सीसीटीव्ही व्हिडीओची चर्चासूर्योदयनगर व जवाहरनगर परिसरात वारंवार मारामारीच्या घटना घडताना दिसत आहेत. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला. त्याची शहरामध्ये दिवसभर चर्चा सुरू होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस