शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ, नागरिकांमधून संताप 

By सचिन भोसले | Updated: October 25, 2023 18:16 IST

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. गेल्या दोन दिवसांत चोरट्यांनी शहर व परिसरातून चार ...

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. गेल्या दोन दिवसांत चोरट्यांनी शहर व परिसरातून चार लाख रूपये किंमतीच्या सात दुचाकींची चोरी झाली आहे. संबधित पोलिस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात पावणे दोन लाख किंमतीच्या दुचाकीचाही समावेश आहे. वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.चोरीच्या घटनेत वरणगे पाडळीतील सचिन बुचडे (वय २५) यांची घराजावळ उभी केलेली ३० हजार किंमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि.२३) रात्री घडली. बुचडे यांनी करवीर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटने गिरगाव (ता. करवीर) तील विनायक श्रीकांत जाधव (वय १९) या युवकाची २५ हजार किंमतीची दुचाकी चोरीस गेली. हीही घटना सोमवारी (दि.२३) घडली. याबाबतची फिर्याद त्याने इस्पुर्ली पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. इचलकरंजी दत्तनगरातील विनोद मधुकर गांजवे (वय ३८) यांची घराज‌वळ उभी केलेली ४० हजार किंमतीची दुचाकी चोरीस गेली. याबाबतची फिर्याद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.औरबाड(ता.शिरोळ) तील इरफान शिराजुद्दीन करीमखान (वय ५४) यांची १ लाख ७० हजार किंमतीची दुचाकी मंगळवारी (दि.२४) चोरीस गेली. याबाबतची फिर्याद त्यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात नोंदविली. वडगावातील जैन बस्ती जवळ उभी केलेली २५ हजारांची दुचाकी चोरीस गेली. याबाबतची फिर्याद शिवाजी केशव मस्के (वय ४९, रा. रामनगर, आष्टा, ता. वाळवा) यांनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. यासह शहरातील शाहूपुरी परिसरातून २५ हजार किंमतीची मोपेड चोरीस गेली आहे. याबाबतची फिर्याद भूमी संजय जाधव ( १९, रा. नाना पाटीलनगर) यांनी फिर्याद दिली आहे.शुक्रवारी (दि.२०) गुजरी परिसरात उभी केलेली दुचाकी चोरीस गेली आहे. याबाबतची फिर्याद सुनील शिवाजी शिंदे (वय रा. २६, म्हारूळ, ता.करवीर ) यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे चार लाख रुपये किंमतीच्या दुचाकी चोरीस गेल्यामुळे वाहनधारकांतून भितीचे वातावरण आहे. पोलिसांनीही तत्परतेने या दुचाकी चोरट्यांच्या माग काढून अटक करावी. अशी मागणी होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस