शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वर्चस्ववादातून विद्यार्थ्यांच्या दोन गटात फिल्मी स्टाईलने हाणामारी, दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 13:31 IST

हातकणंगले : सांगली - कोल्हापूर मार्गावरील अतिग्रे येथील नामांकित विद्यापीठाच्या एम.बी.ए. शाखेच्या कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांच्या दोन गटांत ...

हातकणंगले : सांगली - कोल्हापूर मार्गावरील अतिग्रे येथील नामांकित विद्यापीठाच्या एम.बी.ए. शाखेच्या कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांच्या दोन गटांत मंगळवारी दुपारी वर्चस्व वादातून दगड, चप्पल, चाकूचा वापर करून फिल्मी स्टाईलने झालेल्या हाणामारीत दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या हाणामारीनंतर यड्रावमधील काही युवक आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये घुसून सिक्युरिटी गार्ड, एम.बी.ए. शाखेच्या प्राध्यापक - कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम हातकणंगले पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.याबाबत अधिक माहिती अशी की, अतिग्रे येथील विद्यापीठामध्ये चार दिवसांपासून वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सव सुरू आहे. विद्यापीठाच्या एम.बी.ए. शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये सरकार ग्रुप आणि बागे ग्रुप असे दोन गट आहेत. या दोन गटात सोमवारी जोरदार वादावादी झाली होती. यावर हातकणंगले पोलिसांनी संबंधिताना समज देऊन सोडून दिले होते.मंगळवारी दुपारी हा वाद पुन्हा उफाळला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी केलेल्या चाकूहल्ल्यात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमी विद्यार्थ्याच्या यड्राव येथील समर्थकांनी विद्यापीठात जाऊन प्रचंड राडा घातला. त्यांच्याकडून सिक्युरटी गार्डपासून प्रशासनातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना जोरदार मारहाण करण्यात आली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.हातकणंगले पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. गंभीर जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हाणामारीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस