कोल्हापूर: दोनवडेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 20:25 IST2023-02-20T20:23:32+5:302023-02-20T20:25:34+5:30
दोनवडे (ता. करवीर) येथील शेतकऱ्याने झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम हिंदुराव मगदूम (वय ५५) असे त्यांचे नाव असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

कोल्हापूर: दोनवडेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
कोपार्डे -दोनवडे (ता. करवीर) येथील शेतकऱ्याने झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम हिंदुराव मगदूम (वय ५५) असे त्यांचे नाव असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी तुकाराम मगदूम हे शेतकरी होते.संसाराचा गाडा चालवण्यासाठी ते ऊसतोडणीचेही काम करत होते. आज सकाळी त्यांनी आपल्या शेतातून जनावरासाठी वैरण घेऊन आले होते. साडेदहा नंतर दोनवडे फाटा येथे असलेल्या राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून घेतल्याचा अंदाज आहे. तुकाराम जेवायला आले नाहीत म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला असता नातेवाईकांना त्यांनी घराच्या मागे असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.शेजारच्या मदतीने त्यांना तातडीने खाली उतरून घेऊन उपचारासाठी कोल्हापूर येथे शासकीय रूग्णालयात दाखल केले.पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी कर्ज झाल्याने तुकाराम निराश होते अशी चर्चा घटनास्थळी होती. तुकाराम हे कुटुंबात मिळवती एकमेव व्यक्ती होती.त्यांच्या आत्महत्येने कुटुंबाचा आधार गमावला आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.