शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कार खड्ड्यात कोसळून खुपिरेतील दाम्पत्य ठार, दोन मुले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 13:05 IST

कोपार्डे : कर्नाटकातील ऐनापूर येथे चारचाकी गाडी उलटून झालेल्या अपघातात खुपिरे (ता. करवीर) येथील पती-पत्नी ठार झाले. आदर्श युवराज ...

कोपार्डे : कर्नाटकातील ऐनापूर येथे चारचाकी गाडी उलटून झालेल्या अपघातात खुपिरे (ता. करवीर) येथील पती-पत्नी ठार झाले. आदर्श युवराज पांडव (वय २७), पत्नी शिवानी आदर्श पांडव (२०) अशी त्यांची नावे आहेत. तसेच त्यांचा मुलगा राजवीर (वय ३ वर्षे ) मुलगी अन्वी (वय ६ महिने ) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झाला.घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी, आदर्श युवराज पांडव यांची सासुरवाडी करनूर (ता. कागल) येथे आहे. आदर्श यांच्या मेहुणीचे लग्न ऐनापुर (कागवाड) येथे शुक्रवारी होते. त्यामुळे आदर्श आणि त्याची पत्नी शिवानी हे ऐनापूर-कागवाड येथे सहकुटुंब लग्नाला गेले होते.लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पांडव दांपत्य मुलांसह तसेच त्यांच्या सासूरवाडीचे चारचाकी गाडीतून करनूर गावाकडे- घरी परत येत होते.

कागवाड पासून सुमारे दहा किलोमीटरवर असलेल्या ऐनापुर या ठिकाणी आदर्शचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूच्या नाल्यामध्ये कोसळली. त्यामुळे गाडीचा पुढील भाग दलदल व पाण्यामध्ये गेला तसेच आदर्श व शिवानीच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीतील सर्वजण किरकोळ जखमी झाले.घटनेची माहिती आदर्श चे भाऊ आशिष व अक्षय यांना समजल्यानंतर त्यांचे नातेवाईक तानाजी जाधव ( वरणगे ) यांच्यासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. मयत शिवानीची मुलगी अवघी सहा महिन्याची आहे. सुदैवाने ती बचावली. घटनेची नोंद कागवाड पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू