शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपूर्वी हवेत गोळीबार केला, व्हिडीओ व्हायरल होताच हणमंतवाडीच्या माजी सरपंचावर गुन्हा दाखल झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:42 IST

कोपार्डे-कोल्हापूर : करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे चार वर्षांपूर्वी दसऱ्याच्या सणात बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी माजी सरपंच संग्राम ...

कोपार्डे-कोल्हापूर : करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे चार वर्षांपूर्वी दसऱ्याच्या सणात बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी माजी सरपंच संग्राम हिंदुराव भापकर (वय ४२, रा. हणमंतवाडी) याच्यावर करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गावातील दूध संस्थेची निवडणूक होताच सोशल मीडियात व्हायरल झालेल्या गोळीबाराच्या व्हिडीओमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. भापकर याची बंदूक गेल्या वर्षभरापासून करवीर पोलिस ठाण्यात जमा आहे.करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हणमंतवाडी येथील जय बजरंग सहकारी दूध संस्थेची निवडणूक शनिवारी पार पडली. या निवडणुकीत माजी सरपंच संग्राम भापकर यांच्या गटाने विजय मिळवला. त्यानंतर गावातील काही व्हॉट्सॲप ग्रुपवर भापकर यांनी बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यात त्यांनी दोन गोळ्या हवेत झाडल्याचे दिसत आहे. परवानाधारक बंदुकीतून सार्वजनिक ठिकाणी खुलेआम हवेत गोळीबार केल्याचा प्रकार लक्षात येताच करवीर पोलिसांनी भापकर याला बोलावून चौकशी केली. त्यावेळी व्हायरल व्हिडीओ ऑक्टोबर २०२१मधील असल्याचे स्पष्ट झाले. बंदुकीचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलिसांनी भापकर याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच त्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करणार असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. जुना व्हिडीओ मुद्दाम व्हायरल करणाऱ्यांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबारsarpanchसरपंच