शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘सीडीएम’मध्ये बनावट नोटा भरल्या, गडहिंग्लजच्या एकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:52 IST

फसवणुकीची बँकेची तक्रार : ५०० च्या ३५ नोटा बनावट

गडहिंग्लज : ‘सीडीएम’मध्ये १७५०० रुपयांच्या बनावट नोटा भरून बहुराष्ट्रीय बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गडहिंग्लज पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आकाश रवींद्र रिंगणे (रा. खोत गल्ली, नदीवेस, गडहिंग्लज) असे संशयिताचे नाव आहे. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील एका खासगी व्यापारी संकुलात ‘या’ बँकेची शाखा आहे. बँकेच्या प्रवेशद्वारालगतच ग्राहकांच्या सोयीसाठी पैसे भरणे व काढण्याचे मशीन (सीडीएम) बसवण्यात आले आहे. मंगळवारी (१७) रात्री ११:४५ वाजता आकाशने बँकेतील आपल्या खात्यावर पाचशे रुपयांच्या ३५ नोटा मिळून एकूण १७५०० रुपये भरले होते.दरम्यान, गुरुवारी (१९) एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एटीएममधील पैसे काढल्यानंतर त्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले.बँकेचे उपशाखाधिकारी गौरव खरबुडे यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर अधिक तपास करीत आहेत.

नोटा मध्यरात्री भरल्यामंगळवारी (१७) रात्री पावणे बाराच्या सुमारास आकाशने आपल्या खात्यावर पाचशेच्या ३५ नोटा भरल्या होत्या. त्यामध्ये ‘९ आरके ७७८६१६ या क्रमांकाच्या ४, ९ आरके ७४५११७ या क्रमांकाच्या ८ नोटा, ९ आरके ७४५११८ या क्रमांकाच्या ८ नोटा, ९ आरके ३०५२१९ या क्रमांकाच्या १२ नोटा, ९ आरके ३०५२१५ या क्रमांकाची १ नोट, ९ आरके ७४५१२२ या क्रमांकाची १ तर ९ आरके ७७८६७८ या क्रमांकाची १ या नोटांचा समावेश आहे. त्यांची एकूण किंमत १७५०० आहे.

संशयास्पद नोटा बाजूलामशीनमध्ये पैसे भरल्यानंतर त्या सर्व नोटा ‘मशीन’मधील संशयित नोटांच्या ट्रे मध्ये जाऊन पडल्या होत्या. ‘सीएमएस’च्या कर्मचाऱ्यांकडून मिळाल्यानंतर बँकेच्या कॅशिअरनीही मशीनवर पडताळणी केली. त्यात त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आकाशचा खातेक्रमांक, खात्यावर पैसे भरल्याची वेळ व सीसीटीव्ही फुटेजवरून खात्री झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे वरिष्ठांच्या सूचनेनुसार संशयिताविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली.