शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Kolhapur Crime: सूत पुरवतो म्हणून सांगून व्यापाऱ्याला १ कोटीचा गंडा, पाज जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:20 IST

इचलकरंजी : मागणीप्रमाणे सूत पुरवतो, असे सांगून येथील एका व्यापाऱ्याची एक कोटी २१ लाख ४४ हजार ३७० रुपयांची फसवणूक ...

इचलकरंजी : मागणीप्रमाणे सूत पुरवतो, असे सांगून येथील एका व्यापाऱ्याची एक कोटी २१ लाख ४४ हजार ३७० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सात सूत व्यापाऱ्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मनीषकुमार कैलाशचंद्र धूत (वय ४०, रा. हुलगेश्वरी रोड) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणातील पंकज अग्रवाल याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.अटक केलेल्या पंकज पुष्पक अग्रवाल याच्यासह मयूर पंकज अग्रवाल, वर्षा विशाल अग्रवाल, पियुष पंकज अग्रवाल, प्रवीण पुष्पक अग्रवाल, दिशा प्रवीण अग्रवाल व विशाल ऊर्फ पप्पी अग्रवाल (सर्व रा. कागवाडे मळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, धूत यांचा सूत व कापड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यासाठी ते अग्रवाल यांच्याकडून सूत खरेदी करत होते. त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली होती. या विश्वासाचा गैरफायदा घेत सन २०२२ मध्ये धूत यांना लागणारी ३२ सिंगल कार्डेड कॉटर्न यार्न सुताची १०५५ बाचकी आम्ही तुम्हाला देतो, असे सांगत मयूर, पंकज, पियुष व प्रवीण अग्रवाल यांनी धूत यांच्या कार्यालयात येऊन सांगितले. तसेच त्यासाठीची रक्कम टीडीएस वजा करून अॅडव्हान्समध्ये एका फर्मच्या नावे जमा करण्यास सांगितले आणि जानेवारी २०२३ मध्ये सूत माल देतो, असे सांगून निघून गेले.त्यांच्यावर विश्वास ठेवून धूत यांनी सांगलीच्या एका बॅँकेतून आरटीजीएसद्वारे रक्कम ट्रान्सफर केली. त्यानंतर वारंवार मागणी करूनही अग्रवाल यांनी धूत यांना सूत दिले नाही. त्यामुळे त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावर अग्रवाल यांनी बनावट प्रोफॉर्मा इनव्हॉईसेस तयार करून धूत यांना दिले. त्यावरून अग्रवाल यांनी बनावट कागदपत्रांद्वारे अन्य लोकांना सूत माल देऊन अन्य काही जणांची फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे धूत यांनी अग्रवाल कुटुंबीयांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस