शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात उच्चभ्रू वस्तीत सुरु होता वेश्या अड्डा, पोलिसांनी सर्व्हेच्या बहाण्याने छापा टाकून केली कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 17:41 IST

एका पीडित महिलेची केली सुटका

कोल्हापूर : उच्चभ्रू वस्ती असलेल्या ताराबाई पार्कातील फाळके कंपाउंड येथील मनीष पार्कमध्ये वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी (दि. ५) सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत वेश्या व्यवसाय चालवणारे गौतम संजय धामेजा (वय २१, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गांधीनगर, ता. करवीर) आणि खुशबू सादिक खाटिक (वय ३६, रा. कदमवाडी, कोल्हापूर) या दोघांना अटक करण्यात आली, तर पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली. सहायक पोलिस निरीक्षक श्रद्दा आंबले-बरगे यांनी सर्व्हे करण्याच्या बहाण्याने रो हाउसमध्ये प्रवेश करून वेश्या अड्ड्यावर कारवाई केली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोरले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई पार्क परिसरात एका रो हाउसमध्ये वेश्या अड्डा सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले-बरगे यांच्या पथकाने वेश्या अड्डा सुरू असलेल्या रो हाउसचा शोध सुरू केला. सर्व्हे करण्याच्या बहाण्याने त्यांनी फाळके कंपाउंडमधील मनीष पार्क येथील रो हाउसमध्ये प्रवेश केला. वेश्या अड्डा सुरू असल्याचे लक्षात येताच आंबले यांच्यासह पथकाने कारवाई केली.दोघांना अटकगहाणवट घर घेऊन वेश्या अड्डा चालवणारे गौतम धामेजा आणि खुशबू खाटिक या दोघांना पोलिसांनी अटक केली, तर एका पीडित महिलेची सुटका केली. अटकेतील संशयितांचे मोबाईल आणि रो हाउसमधील साहित्य असा सुमारे ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. धामेजा आणि खाटिक या दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस