Kolhapur Crime: एसटीत सीट पकडायला खिडकीतून बॅग टाकली, चोरट्याने लांबवली, सात तोळे सोन्याचा ऐवज लंपास
By उद्धव गोडसे | Updated: May 11, 2023 16:40 IST2023-05-11T16:11:26+5:302023-05-11T16:40:29+5:30
कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात इस्लामपूरला जाणा-या एसटीत सीट पकडण्यासाठी खिडकीतून आत टाकलेली बॅग चोरट्याने काही क्षणात लंपास ...

Kolhapur Crime: एसटीत सीट पकडायला खिडकीतून बॅग टाकली, चोरट्याने लांबवली, सात तोळे सोन्याचा ऐवज लंपास
कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात इस्लामपूरला जाणा-या एसटीत सीट पकडण्यासाठी खिडकीतून आत टाकलेली बॅग चोरट्याने काही क्षणात लंपास केली. बॅगमध्ये गंठण, कानातील टॉप्स असे सात तोळ्यांचे दागिने मोबाइलसह सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल होता.
हा प्रकार मंगळवारी (दि,९) सायंकाळच्या सुमारास घडला. याबाबत अश्विनी सतीश खांबे (वय ३२, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अश्विनी खांबे या त्यांचा भाऊ सुमित पाटील याच्यासोबत एसटीने इस्लामपूरला जाणार होत्या. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात इस्लामपूरला जाणारी एसटी येताच त्यांनी सिट पकडण्यासाठी खिडकीतून आत बॅग टाकली.
गर्दीतून आत गेल्यानंतर त्यांना सिटवर बॅग आढळली नाही. चोरट्याने काही क्षणात हातोहात बॅग लंपास केली. बॅगमध्ये गंठण, कानातील टॉप्स असे सात तोळ्यांचे दागिने आणि मोबाइल होता. सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद खांबे यांनी शाहूपुरी पोलिसात दिली.