नवे रुग्ण ९९६, मृत्यू ४६, डिस्चार्ज ९२३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:25 AM2021-05-09T04:25:57+5:302021-05-09T04:25:57+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत नवे ९९६ कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले असून, ४६ ...

996 new patients, 46 deaths, 923 discharges | नवे रुग्ण ९९६, मृत्यू ४६, डिस्चार्ज ९२३

नवे रुग्ण ९९६, मृत्यू ४६, डिस्चार्ज ९२३

Next

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत नवे ९९६ कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले असून, ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील १३ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील काही तालुक्यांतील कोरोना रुग्णांची संख्या घटली असून, काही तालुक्यांतील संख्या वाढतीच आहे. कोल्हापूर शहरामध्ये नवे १९४ रुग्ण आढळले असून, ही संख्या गेल्या दोन दिवसांपेक्षा कमी आहे. इतर जिल्ह्यांतील आणि राज्यांतील १५८ जणांना कोरोना झाला असून, करवीर तालुक्यात १३८ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ९२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत, ही दिलासादायक गोष्ट आहे.

दिवसभरामध्ये २१२३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, ३१०२ जणांचे स्राव घेण्यात आले आहेत. १५२३ जणांची ॲन्टिजन चाचणी घेण्यात आली असून ११ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

चौकट

सर्वाधिक मृत कोल्हापूर शहरातील

कोल्हापूर १३

आर.के.नगर, शिवाजी पेठ ०२, कसबा बावडा, जरगनगर, कदमवाडी, बोंद्रेनगर, ताराबाई पार्क, रमणमळा, कावळा नाका, जाधववाडी, विक्रमनगर

इचलकरंजी ०४

इचलकरंजी ०४

पन्हाळा ०१

नावली

शाहूूवाडी ०२

मजले, डोणोली

करवीर ०४

वळिवडे, हणमंतवाडी, माने मळा, उचगाव, उचगाव

हातकणंगले ०६

नवे पारगाव ०२, हुपरी, कोरोची, हेर्ले २

शिरोळ ०३

चिंचवडे, दानोळी, शिरोळ

चंदगड ०१

वाकोली

कागल ०३

सिद्धनेर्ली, कागल, काळम्मावाडी वसाहत, कागल

भुदरगड ०१

देवकूळवाडी

इतर ०८

सोमदेवर (जि. विजापूर), तासगाव, शिगाव, संगमेश्वर, कणकवली, शेणोली, बोरगाव

Web Title: 996 new patients, 46 deaths, 923 discharges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app