कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असल्याने शक्तिप्रदर्शन करत ४६० उमेदवारांनी ५९८ अर्ज दाखल केले. बारा पंचायत समितीतील जागांसाठी ९८५ उमेदवारांनी ११५९ अर्ज दाखल केले. अर्ज भरण्याच्या दिवसाखेर जिल्हा परिषदेसाठी ७०३ उमेदवारांचे ९०७ अर्ज तर पंचायत समितीसाठी १२८९ उमेदवारांनी १५३० अर्ज दाखल केले.अर्जांची छाननी उद्या गुरुवारी असून माघारीची मुदत मंगळवारपर्यंत आहे. त्याचदिवशी चिन्हे वाटप आहेत. ५ फेब्रुवारीस मतदान तर ७ ला मतमोजणी होत आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला.जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी ही लढत होत आहे. जागा आणि दाखल अर्जांचा विचार करता जिल्हा परिषदेला एका जागेसाठी सरासरी ५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील माघार किती घेतात, यावरच लढत किती रंगी होणार आहे, हे ठरणार आहे. राजकीय पक्षाकडून, उमेदवाराकडून मंगळवारपर्यंत माघारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली जाऊ शकते. काही डमी अर्जही मागे घेतले जातात. काहीचे अर्ज छाननीत निकाली निघतात. नगरपालिका, महापालिकांच्या पाठोपाठ जिल्हा परिषदेलाही तितकीच चुरस असल्याचे अर्ज संख्येवरून दिसत आहे.ज्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली आहे, ते आज गुरुवारपासून प्रचारासाठी बाहेर पडण्यास मोकळे झाले. अनेकांनी व्यक्तिगत प्रचारही सुरू केला आहे. पण आता उमेदवारीसह चिन्ह पोहोचवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. कालपर्यंत एका पक्षात होते, ते आज अर्ज दाखल करताना दुसऱ्याच पक्षात गेले आहेत. त्यामुळे अशांना बदललेले चिन्ह घरोघरी नेण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.तालुकानिहाय दाखल अर्जांची बुधवार अखेर माहिती :तालुका : जिल्हा परिषद : पंचायत समितीशाहूवाडी : २४ : ४२पन्हाळा : ८४ : १०३शिरोळ : १०२ : १२६करवीर : १७९ : २३४गगनबावडा : १२ : १९राधानगरी : १०७ : २०३कागल : ६७ : १६६भुदरगड : ५४ : १३६आजरा : २१ : ४१गडहिंग्लज : ७५ : १४१चंदगड : ४४ : १२२हातकणंगले : १३७ : १९८एकूण : ९०७ : १५३०
Web Summary : Kolhapur ZP election sees 907 ZP and 1530 Panchayat Samiti applications. Scrutiny tomorrow, withdrawals by Tuesday; symbols allocated then. Voting on February 5th, counting on 7th. Intense competition expected.
Web Summary : कोल्हापुर ZP चुनाव में 907 ZP और 1530 पंचायत समिति आवेदन। कल जांच, मंगलवार तक नाम वापस लिए जा सकते हैं; उसी दिन चुनाव चिन्ह आवंटित। 5 फरवरी को मतदान, 7 को मतगणना। कड़ी प्रतिस्पर्धा की उम्मीद।