सुट्टीच्या दिवशीदेखील ९ हजार नागरिकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST2021-04-05T04:20:40+5:302021-04-05T04:20:40+5:30
कोल्हापूर: रविवारी सुट्टीचा दिवस असताना आरोग्य विभागाने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे जिल्ह्यातील ३५० केंद्रावर ९ हजार ८५७ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक ...

सुट्टीच्या दिवशीदेखील ९ हजार नागरिकांनी घेतली लस
कोल्हापूर: रविवारी सुट्टीचा दिवस असताना आरोग्य विभागाने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे जिल्ह्यातील ३५० केंद्रावर ९ हजार ८५७ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली.
एका बाजूला कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, दुसऱ्या बाजूला लसीकरणाच्या मोहिमेनेही वेग घेतला आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील सरसकट नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याला कोल्हापुरकरांनी पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद दिला आहे. रांगा लावून लोकांनी लस टोचून घेतली आहे.
जिल्ह्यात ४५ वयोगटावरील नागरिकांची संख्या साडेअकरा लाखावर आहे. चार दिवसात रोज ८ ते ९ हजार याप्रमाणे आतापर्यंत २६ हजार २५७ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनाचा लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी म्हणून शासनाने सुट्टीच्या दिवशी लसीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रविवारी ही मोहीम आरोग्य विभागाने तयार केलेल्या ३५० केंद्रावर सुरू राहिली. याशिवाय फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षावरील आणि ४५ वर्षवरील व्याधीग्रस्त असे मिळून ३ लाख ९४ हजार जणांनी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे.