शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी ९००१ जागा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 11:30 IST

कोल्हापूर शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या प्रवेश फेरीत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या एकूण ५६५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दुसऱ्या फेरीसाठी एकूण ९००१ जागा रिक्त असून त्यासाठी ७००५ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया शनिवार (दि. २०) पासून सुरू होणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या फेरीत ५६५५ जणांचे प्रवेश निश्चितअर्ज करण्याची प्रक्रिया शनिवारपासून

कोल्हापूर : शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या प्रवेश फेरीत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या एकूण ५६५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दुसऱ्या फेरीसाठी एकूण ९००१ जागा रिक्त असून त्यासाठी ७००५ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया शनिवार (दि. २०) पासून सुरू होणार आहे.या महाविद्यालयांतील एकूण १४ हजार ६५६ जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी एकूण १२ हजार ६६० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. समितीकडून प्रवेशाची पहिली फेरी दि. ११ जुलैपासून सुरू झाली. या फेरीतील प्रवेशाची मुदत मंगळवारी संपली.

या मुदतीत पहिली फेरी आणि व्यवस्थापन, इन हाऊस कोट्यासह एकूण ५६५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. मंगळवारी दिवसभरात ४४० विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. दुसऱ्या फेरीसाठी समितीकडे सध्या ७००५ विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. या फेरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया शनिवार (दि. २०) ते मंगळवार (दि. २३) दरम्यान होणार आहे. दुसरी फेरी अंतिम असणार आहे. त्याद्वारे अलॉट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक राहणार असल्याची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी मंगळवारी दिली.

आकडेवारी दृष्टिक्षेपातविद्याशाखा              प्रवेश क्षमता   दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांचे अर्ज

कला (इंग्रजी माध्यम)         ५३                     २४कला (मराठी)                  २७०३                   ८८६वाणिज्य (मराठी)            २१८९                 १५४३वाणिज्य (इंग्रजी)               ७२२                १२५५विज्ञान                             ३३३४                ३२९७

पहिल्या फेरीत निश्चित झालेले प्रवेशकला (इंग्रजी) : ६७कला (मराठी) : ८५७वाणिज्य (मराठी) : १०२८वाणिज्य (इंग्रजी) : ७५१विज्ञान : २२८५ 

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर