शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये ८८ टक्के पाणी, शेतीच्या सिंचनावर मर्यादा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 12:13 IST

जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा किती...जाणून घ्या

कोल्हापूर : पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने हिवाळ्यातच जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ८८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाण्याची प्रचंड मागणी वाढल्याने पुढच्या पावसाळ्यापर्यंत धरणातीलपाणी पुरविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. यामुळे आत्तापासून पाटबंधारे प्रशासनाने शेतीसाठी उपसाबंदी लागू केली आहे.जिल्ह्यात मोठे प्रकल्प चार, मध्यम प्रकल्प दहा, लघु पाटबंधारे प्रकल्प ५६ आहेत. या सर्व धरणांत ८८ टक्केच पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच दिवसात ८७ टक्के पाणीसाठा होता. मात्र, यंदा सर्व धरणे शंभर टक्के भरलेली नाहीत. यामुळे उपलब्ध असलेले पाणी जपून वापरावे लागणार आहे. दरम्यान, दूधगंगा (काळम्मावाडी) धरणाला गळती आहे. ती काढण्याचे नियोजन केले आहे. या धरणातील पाण्यावर यंदा उसाचे क्षेत्र कमी करा, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनाने केले आहे.त्याच धरणावरून कोल्हापूर शहरासाठी थेट पाइपलाइन योजनेतून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. यासाठीही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत आहे. सर्वच धरणांतून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. परिणामी मागणीनुसार पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरविण्याचे आव्हान पाटबंधारे प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

तीन धरणांत शंभर टक्के पाणीचित्री, घटप्रभा, जांबरे या तीन मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा आहे. याउलट सर्वात कमी ५६ लघुपाटबंधारे प्रकल्पांत ८२ टक्के तर तुळशी, दूधगंगा धरणात ८३ टक्के पाणीसाठा आहे.

आज बैठककोल्हापूर ताराबाई पार्कातील पाटबंधारे कार्यालयात आज, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसाेबत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत उन्हाळ्यात शेती तसेच पिण्यासाठी पाणी कमी पडू नये, यासाठी आत्तापासून उपसाबंदी करण्यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांतील यंदाचा आजपर्यंत आणि गेल्यावर्षाचा पाणीसाठा टीएमसीमध्ये कंसात असा :राधानगरी : ७.४८ (७.८६), तुळशी : २.८७ (३.३३), दूधगंगा : २१.१३ (१८.९२), वारणा : ३१.९ (३२.६), कासारी : २.६८ (२.४९), कडवी : २.२७, कुंभी : २.६४ (२.५१), पाटगाव :३.६३ (३.५७), चिकोत्रा : १.२९ (१.५२), चित्री : १.८८ (१.८५), जंगमहट्टी : १.२२ (१.१९), घटप्रभा : १.५६ (१.५५), जांबरे : ०.८२ (०.८२), आंबेओहोळ : १.२० (१.०१).

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी