राधानगरीतून 8540, कोयनेतून 70404 तर अलमट्टीमधून 182000 विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:33 PM2019-09-08T12:33:09+5:302019-09-08T12:35:34+5:30

राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाज्यामधून 8540, कोयनेतून 70404 तर अलमट्टीमधून 182000 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी 10 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी 38.5 फूट इंच होती. जिल्ह्यातील 67 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे.

8540 from Radhanagari, 70404 from Coin and 182000 from Almaty | राधानगरीतून 8540, कोयनेतून 70404 तर अलमट्टीमधून 182000 विसर्ग

राधानगरीतून 8540, कोयनेतून 70404 तर अलमट्टीमधून 182000 विसर्ग

Next
ठळक मुद्देराधानगरीतून 8540, कोयनेतून 70404 तर अलमट्टीमधून 182000 विसर्गजिल्ह्यातील 67 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाज्यामधून 8540, कोयनेतून 70404 तर अलमट्टीमधून 182000 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी 10 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी 38.5 फूट इंच होती. जिल्ह्यातील 67 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणात आज अखेर 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे हे 5 बंधारे पाण्याखाली आहेत. तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी हे 3 बंधारे पाण्याखाली आहे. कासारी नदीवरील करंजफेण, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ- तिरपण, ठाणे -आवळे व यवलुज हे 6 बंधारे पाण्याखाली आहेत. कुंभी नदीवरील शेणवडे, कळे (खा), वेतवडे, मांडुकली, सांगशी व कातळी हे 6 बंधारे पाण्याखाली आहेत.

धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली, माणगांव, कोडोली, चावरे, मांगले सावर्डे, तांदूळवाडी, शिगाव, खोची व दानोळी हे 9 बंधारे पाण्याखाली आहे. कडवी नदीवरील सवते सावर्डे, शिरगाव, कोपार्डे व बाचणी हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिंध्दनेर्ली, सुळकुड, बाचणी, कसबा वाळवे, तुरंबे आणि सुळंबी हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत.

वेदगंगा नदीवरील कुरणी, सुरुपली बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, शेळोशी आणि वाघापूर हे 8 बंधारे, हिरण्यकेशी नदीवरील खंदाळ, ऐनापूर, गिजवणे व निलजी हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. घटप्रभा नदीवरील तारेवाडी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे आणि आडकुर हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी व हल्लारवाडी असे एकूण 67 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यातील धरणांमधून क्युसेकमधील होणारा विसर्ग पुढीलप्रमाणे
 वारणा- 13150,
तुळसी- 1956,
कुंभी-1850,
कासारी-1100,
दूधगंगा-13200 

Web Title: 8540 from Radhanagari, 70404 from Coin and 182000 from Almaty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.