कोल्हापूर : कोकोपीठच्या नावाखाली ८३ किलो गांजा विक्रीसाठी घेऊन आलेला समीर पापा शेख (वय ३४, रा. कात्रज, पुणे) याला राजारामपुरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून २० लाख ७८ हजार रुपये किमतीचा ८३ किलो गांजा आणि टेम्पो असा २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सरनोबतवाडीच्या हद्दीत राजाराम तलावाजवळ मंगळवारी (दि. २७) सायंकाळी ही कारवाई केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी बुधवारी (दि. २८) पत्रकार परिषदेत दिली.राजारामपुरी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सचिन चंदन यांना राजाराम तलाव परिसरात एक व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयित टेम्पो पकडला. झडतीदरम्यान टेम्पोमध्ये ८३ किलो गांजा सापडला. चालक शेख याला अटक करून अधिक चौकशी केली. 'पुण्यातील टेम्पोमालकाने कोकोपीठ कोल्हापुरात पोहोचविण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार माल घेऊन कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात पोहोचल्यानंतर ते माल घेणाऱ्या व्यक्तीचा पत्ता पाठवणार होते,' अशी माहिती शेख याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्याकडील ८३ किलो गांजा, टेम्पो, मोबाइल असा २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.कारवाई करताच मोबाइलवर ११ कॉलगांजा घेऊन आलेला टेम्पो पोलिसांनी पकडताच चालक शेख याच्या मोबाइलवर एका नंबरवरून ११ वेळा कॉल आला. तीच व्यक्ती टेम्पोचा मालक असावी. कारवाईची माहिती त्याला मिळाली असावी. त्याचे आणखी काही साथीदार टेम्पोसोबत असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. मोबाइल नंबरवरून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Summary : Kolhapur police arrested a Pune driver with 83 kg of ganja disguised as cocopeat. The seized drugs and vehicle are valued at ₹2.6 million. Police suspect a larger network and are investigating phone records.
Web Summary : कोल्हापुर पुलिस ने कोकोपीट के रूप में छिपाकर रखे 83 किलो गांजे के साथ पुणे के एक ड्राइवर को गिरफ्तार किया। जब्त किए गए ड्रग्स और वाहन की कीमत ₹2.6 मिलियन है। पुलिस को एक बड़े नेटवर्क का संदेह है और फोन रिकॉर्ड की जांच कर रही है।