शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

प्रतिचेरापुंजी असलेल्या किटवडे परिसरात ४ दिवसात ८१६ मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 11:10 AM

Rain Ajra Kolhapur- आजरा तालुक्यात गेल्या ४ दिवसात सरासरी ४३७ मि.मी.पाऊस झाला आहे. तर प्रती चेरापुंजी असलेल्या किटवडे येथील पर्जन्यमापक यंत्रात ८१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २० वर्षात इतका उच्चांकी पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्याच पावसाने तालुक्यातील एरंडोळ व धनगरवाडी धरणे भरली आहेत.तर आजरा गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.

ठळक मुद्देप्रतिचेरापुंजी असलेल्या किटवडे परिसरात ४ दिवसात ८१६ मि.मी. पाऊस वीस वर्षातील उच्चांकी पाऊस.

सदाशिव मोरेआजरा -आजरा तालुक्यात गेल्या ४ दिवसात सरासरी ४३७ मि.मी.पाऊस झाला आहे. तर प्रती चेरापुंजी असलेल्या किटवडे येथील पर्जन्यमापक यंत्रात ८१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २० वर्षात इतका उच्चांकी पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्याच पावसाने तालुक्यातील एरंडोळ व धनगरवाडी धरणे भरली आहेत.तर आजरा गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.कोल्हापूर व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला आजरा तालुक्यातील किटवडे हे गाव आहे.या परिसरात प्रतिवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी दररोज १५० ते २०० मि.मी. पाऊस पडतो.

चालू वर्षीही जून महिन्यात चार दिवस पडलेल्या उच्चांकी पावसाने धरणे भरली असून ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत.मुसळधार पडलेल्या पावसाने भात पेरणी व टोकणणी केलेल्या जमिनीत पाणी तुंबले आहे. तर आजरा परिसर व पश्चिम भागात भात रोप लागणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.किटवडे धनगरवाड्याच्या पठारावर प्रतिवर्षी कास पठाराप्रमाणे विविध प्रकारची फुलेही फुललेले असतात. या परिसरातील निसर्ग पर्यटकांना साद घालत असतो. पावसात ओलं चिंब भिजण्यासाठी पर्यटक प्रतिवर्षी येत असतात. मात्र कोरोनामुळे दोन वर्षात निसर्गाचा आस्वाद घेण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. दररोज पडणाऱ्या मुसळधार पावसाने या परिसरात भात व उसाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते.

प्रतिवर्षी अतिवृष्टीचा पाऊस व ऊसावर पडणारा तांबेरा रोग यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. अतिपावसाने हेक्‍टरी उसाचे उत्पादन कमी होते तर भाताचे उत्पादन चांगले येते मात्र त्याला दर मिळत नाही अशी विचित्र अवस्था आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेला व सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेले किटवडे, घाटकरवाडी, सुळेरान व आंबाडे हा परिसर पाहण्यासाठी प्रतिवर्षी पर्यटकांची हाउसफुल्ल गर्दी असते. आजरा - आंबोली मार्गावर घाटकरवाडी फाट्यापासून तीन कि.मी. अंतरावर किटवडे हे गाव असून अतिवृष्टी व फुलणाऱ्या फुलांमुळे काही तरुणांना रोजगारही मिळाला आहे.किटवडे परिसरात गेल्या चार वर्षात १६ ते १९ जून दरम्यान पडलेला पाऊस

  • २०१८ - १२० मि.मी.
  • २०१९ - ८० मि.मी.
  • २०२० - २१० मि. मी.
  • २०२१ - ८१६ मि. मी.

आजरा तालुक्यात गेल्या चार वर्षात 16 ते 19 जून दरम्यान पडलेला सरासरी पाऊस

  • २०१८ - १२ मि. मी.
  • २०१९ - ६ मि. मी.
  • २०२० - १९० मि. मी.
  • २०२१ - ४३७ मि. मी.

किटवडे परिसरातील जूनअखेरचा चार वर्षातील पाऊस

  • २०१८ - ९१२ मि. मी.
  • २०१९ - ४९१ मि. मी.
  • २०२० - १४०६ मि. मी.
  • २०२१ - १९४६ मि. मी. ( २० जून २०२१ अखेर ).
टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर