शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० जणांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण कोणते.. वाचा

By उद्धव गोडसे | Updated: November 29, 2025 16:35 IST

कोल्हापूर : ऊस दराच्या मुद्द्यावरून पुणे-बंगळुरू महामार्गावर सांगली नाका येथे झालेल्या हिंसक आंदोलनाच्या खटल्याचा कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात निकाल ...

कोल्हापूर : ऊस दराच्या मुद्द्यावरून पुणे-बंगळुरू महामार्गावर सांगली नाका येथे झालेल्या हिंसक आंदोलनाच्या खटल्याचा कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात निकाल लागला. जिल्हा न्यायाधीश (२) डी. व्ही. कश्यप यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० आंदोलकांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयानंतर आंदोलकांनी न्यायालयाबाहेर आनंदोत्सव साजरा केला. तसेच आंदोलनाला पुन्हा बळ मिळाल्याची भावना शेट्टी यांनी व्यक्त केली.ऊस दर आंदोलनादरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याने एकूण तीन हजार ७८१ आंदलोकांवर गुन्हे दाखल झाले होते. यात शिरोली नाका परिसरातील ८० आंदोलकांचा समावेश होता. या खटल्याचा निकाल देताना जिल्हा न्यायाधीश (२) कश्यप यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राजू शेट्टी आणि ८० आंदोलकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. संघटनेच्या वतीने ॲड. ब्रिजेश शास्त्री, ॲड. श्रेणिक पाटील, ॲड. अमेय मकरे, ॲड. सुवर्णभद्र पाटील, आदींनी कामकाज पाहिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Raju Shetti, 80 acquitted in sugarcane price protest case.

Web Summary : Ex-MP Raju Shetti and 80 protesters acquitted in 2013 sugarcane price protest case. Court cites lack of evidence. Supporters celebrated the verdict.