दिवसात मालमत्ता करापोटी ७४ लाख ५३ हजार रुपये जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:28 AM2021-03-01T04:28:52+5:302021-03-01T04:28:52+5:30

कोल्हापूर : घरफाळा अर्थात निवासी मिळकत सवलत योजनेच्या अखेरच्या दिवशी महापालिकेच्या विविध सुविधा केंद्रांमध्ये रविवारी दिवसभरात ७४ लाख ...

74 lakh 53 thousand in property tax per day | दिवसात मालमत्ता करापोटी ७४ लाख ५३ हजार रुपये जमा

दिवसात मालमत्ता करापोटी ७४ लाख ५३ हजार रुपये जमा

Next

कोल्हापूर : घरफाळा अर्थात निवासी मिळकत सवलत योजनेच्या अखेरच्या दिवशी महापालिकेच्या विविध सुविधा केंद्रांमध्ये रविवारी दिवसभरात ७४ लाख ५३ हजार ७१४ रुपये, तर आजअखेर ९१ हजार १९० मिळकत धारकांकडून थकबाकीसह ५१ कोटी ९३ लाख ८७ हजार ५२४ रुपये वसूल करण्यात महापालिका कर विभागाला यश आले.

कोरोना व अन्य कारणांनी थकीत राहिलेला घरफाळा व मालमत्ता करासाठी महापालिकेने सवलत योजना आणली होती. त्याद्वारे रविवारी अखेरच्या दिवशी महापालिकेच्या विविध नागरी सुविधा केंद्रातून २७७ मिळकतींतून मागील थकबाकी ३७ लाख ३७ हजार व चालू मागणी १२ लाख ४० हजार ९६६ आणि त्यावरील दंड व्याज २४ लाख ७८ हजार ७७१ असे एकूण मिळून ७४ लाख ५३ हजार ७१४ इतके रुपये दिवसभरात जमा झाले. विशेष म्हणजे मानसिंग पाटील या करदात्याने आपला थकीत मालमत्ता कर ३० लाख १२ हजार ८४२ रुपये इतका रविवारी भरला. याबद्दल या करदात्याचा सहायक आयुक्त तथा कर निर्धारक विनायक औंधकर यांच्याहस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

नागरी सुविधा केंद्रनिहाय कर असा जमा...

ताराराणी मार्केट - ४२ लाख ७७ हजार २१९

गांधी मैदान - ९ लाख २६ हजार ४५२

राजारामपुरी - ८ लाख ५५ हजार ८०७

शिवाजी मार्केट - ७ लाख ६९ हजार ७ रुपये

मुख्य इमारत - ३ लाख ९२ हजार ९१३

कसबा बावडा - १ लाख ७६ हजार ६५२

चौकट

२६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ अशा कालावधीत ही सवलत योजना सुरू होती. यात ६ हजार ९९३ मिळकतींमधून मागील थकबाकी ५ कोटी २ लाख ७२ हजार ४९२ व चालू मागणी २ कोटी ४५ लाख ६६ हजार २४४ आणि त्यावरील दंड व्याजापोटी २ कोटी ७० लाख ५५ हजार ९५७ असा एकूण १० कोटी १८ लाख ९४ हजार ६९३ असा कर महापालिकेने वसूल केला.

फोटो : २८०२२०२१-कोल-महापालिका

ओळी : तीस लाखांचा थकीत मालमत्ता कर एकरकमी भरल्याबद्दल मानसिंग पाटील यांचा महापालिका सहायक आयुक्त विनायक औंधकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कर अधीक्षक विजय वणकुद्रे, प्रताप माने, शंकर कोळी, भगवान मांजरे, अर्जुन बुचडे आदी उपस्थित होते.

Web Title: 74 lakh 53 thousand in property tax per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.