शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

पाच हजार शेतकऱ्यांची ७० कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 4:55 AM

महारयतने घातला गंडा : दोन आरोपी कोल्हापुरातून ताब्यात

अमरावती : कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायात महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीने राज्यभरातील पाच हजार शेतकऱ्यांची सुमारे ७० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीत पुढे आली आहे. अमरावती येथील गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रोड्यूस वाँरन्टवर सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा.इस्लामपूर, जि. सांगली) या दोघांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांना अमरावती येथील न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महारयतचा संचालक सुधीर माहिते याने सहकारी संदीप मोहिते याच्या मदतीने राज्यभरातील अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शनात स्टॉल लावले होते. त्यांच्या कंपनीत ५२५ कर्मचारी कार्यरत होते. १०० कडकनाथ कोंबड्यांमागे तब्बल ३ लाख १५ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची हमी त्यांनी शेतकºयांना दिली. मात्र, कंपनीकडून कुठल्याही प्रकारची सुविधा अथवा कोंबड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत.आरोपी हे ‘मोहिते बंधू’ नाहीत

राज्यभरातील शेतकºयांना गंडा घालणारे आरोपी हे ‘मोहिते बंधू’ नावाने प्रसिद्धीस आले असले तरी ते एकमेकांचे भाऊ नाहीत. मोहितेवाडीत राहणारे असल्यामुळे या दोघांना ‘मोहिते बंधू’ म्हणून ओळखले जात आहे. ते केवळ कोंबडीपालन व्यवसायात खाद्य पुरवठादार आहेत.कोट्यवधींची संपत्ती जप्तआर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अतुल वर, पोलीस हवालदार राजेश शेंडे, शैलेश रोंघे, दीपक धोटे यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची इस्लामपुरातील उंडी उबवण केंद्रातील मशीनरी, तीन महागडी वाहने जप्त केली. आणखी मालमत्ता उघड करण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत