अकरावी विज्ञानसाठी ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील ६५४० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 17:26 IST2020-08-25T17:21:41+5:302020-08-25T17:26:02+5:30
कोल्हापूर शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी सोमवारपर्यंत ६५४० इतक्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत.त्यापाठोपाठ वाणिज्य मराठी माध्यमाचे २२२० अर्ज आहेत.

अकरावी विज्ञानसाठी ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील ६५४० अर्ज
कोल्हापूर : शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी सोमवारपर्यंत ६५४० इतक्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत.त्यापाठोपाठ वाणिज्य मराठी माध्यमाचे २२२० अर्ज आहेत.
अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सोमवारपर्यंत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे एकूण १२१५१ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये कला इंग्रजी माध्यमासाठी ७८, मराठी माध्यमासाठी १५३०, वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी १७८३ आणि मराठी माध्यमासाठी २२२० अर्ज आहेत.
ऑनलाईन अर्जातील पहिल्या भागाची १४२५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी (आयटीआय) अर्ज करण्याची मुदत दि. ३१ ऑगस्टपर्यंत आहे.
आतापर्यंत राज्यभरातून २८६७८२ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. २६०४५९ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले आहेत. २५११२७ जणांनी शुल्क अदा केले आहे. २३७७८५ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम आणि संस्थानिहाय विकल्पांची नोंद केली आहे.
तंत्रनिकेतनसाठी आज अंतिम दिवस
शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक)मधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा आज, मंगळवार अंतिम दिवस आहे. कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमधील सुविधा केंद्रात शंभर विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी करून घेतली आहे.