शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

२१ दिवसांत ६५०० किलोमीटर; कोल्हापूरच्या चौघांनी बुलेटवरून उत्तराखंडमार्गे गाठले नेपाळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 18:30 IST

सुमारे २५ ते ३० किलो वजन असलेले साहित्य घेत पूर्ण केला प्रवास

कोल्हापूर : येथील रॉयल रायडर्स, कोल्हापूर या नामांकित रायडिंग क्लबच्या सदस्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एनआरएम नेपाळ रायडर्स मीटमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवत कोल्हापूरच्या क्रीडाविश्वाचा गौरव वाढविला. क्लबचे अध्यक्ष जयदीप पवार, संचालक शीतल मुकरे, तसेच पांडुरंग चव्हाण आणि जोनिश जैन या चौघांनी बुलेटवरून उत्तराखंडमार्गेनेपाळ गाठले आणि २१ दिवसांत ६,५०० किलोमीटरचा प्रदीर्घ आणि साहसी प्रवास पूर्ण करून पुन्हा कोल्हापूरला परतले आहेत.क्लबचे अध्यक्ष जयदीप पवार, संचालक शीतल मुकरे, पांडुरंग चव्हाण आणि जोनीश जैन या चौघांनी नेपाळ येथे फ्रेंड्स ऑफ राॅयल एनफिल्ड या संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात दिमाखदार उपस्थिती लावली. रात्री तीन डिग्री तापमान, उत्तर प्रदेशातील सोनोली बॉर्डर, बिहारच्या खानोल बॉर्डरपासून डोंगराळ, उंचसखल भागांतून प्रवास, सरासरी ३०० किलोमीटरचे लक्ष्य, सुमारे २५ ते ३० किलो वजन असलेले साहित्य घेत महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, दिल्ली, बिहार या सात राज्यांतून नेपाळचा प्रवास त्यांनी पूर्ण केला. रस्ते सुरक्षा जनजागृती करणे आणि नेपाळमधील पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. ही संस्था नेपाळमधील ७८ रायडिंग क्लबचे प्रतिनिधित्व करते. नेपाळ पर्यटन विभागाच्या निमंत्रणावरून भारतातील विविध रायडिंग क्लबना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

दरम्यान, या रायडर्ससोबत उपाध्यक्ष यश सबनीस आणि हर्ष सबनीस हे कोल्हापूर ते उत्तराखंड आणि परत कोल्हापूर असा प्रवास करत उत्तराखंड येथे आयोजित ‘ब्रदरहूड ऑफ बुलेटर्स ॲण्ड मोटारसायकलिस्ट कान्सोरिटीएम’ या राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्यात सहभागी झाले. ऋषिकेश येथील ही संघटना देशातील ८०० रायडिंग क्लबचे प्रतिनिधित्व करते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Riders Conquer Nepal: 6500 km Bullet Journey in 21 Days

Web Summary : Kolhapur's Royal Riders excelled at Nepal's international meet, riding बुलेट through seven states over 6,500 km in 21 days. Promoting road safety and tourism, they joined riders from 78 Nepalese clubs after an invitation from Nepal's tourism department.