शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इचलकरंजीतील ३ प्रकल्पांना ६०९ कोटी निधी मंजूर, ‘पंचगंगा’ प्रदूषण रोखण्यास मोठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:24 IST

दोन प्रकल्प उन्नतीकरण व क्षमता वाढ : एका नवीन प्रकल्पास मंजुरी

इचलकरंजी : पंचगंगा नदीतीलप्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला. इचलकरंजी परिसरातील औद्योगिक पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अस्तित्वात असणाऱ्या दोन प्रकल्पांना उन्नतीकरण व क्षमता वाढ आणि एका नवीन प्रकल्पास मंजुरी दिली. त्यासाठी एकूण ६०९ कोटी ५८ लाख रुपये निधीही मंजूर केला आहे. हे प्रकल्प उभारणीसाठी उद्योजकांना कोणतीही रक्कम घालावी लागणार नसल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.इचलकरंजी शहराला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा आणि पंचगंगा नदीप्रदूषण हे दोन महत्त्वाचे मुद्दे गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून चर्चेत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही हा मुद्दा गाजला. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याने अखेरच्या लगबगीत का होईना शासनाने हालचाली करत प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. औद्योगिक सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत असल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या. शासनाच्या अनेक अहवालांमध्येही याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती. सध्या अस्तित्वात असलेल्या सीईटीपी प्रकल्पास झेडएलडी प्रकल्पानुसार अद्ययावत करणे आवश्यक होते.

सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इचलकरंजी परिसरातील औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ६०९ कोटी ५८ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या रकमेतून इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहत व लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहत यामध्ये अस्तित्वात असलेल्या सीईटीपी प्रकल्पाची सुधारणा व उन्नतीकरण आणि क्षमता वाढ करण्यात येणार आहे तसेच यड्राव (ता.शिरोळ) येथे नवीन सीईटीपी प्रकल्प बांधण्यात येणार आहे.

एकूण निधीसाठी २५ टक्के रक्कम म्हणजेच १५२ कोटी ३९ लाख रुपये वस्त्रोद्योग विभागाने, ५० टक्के रक्कम म्हणजे ३०४ कोटी ८० लाख रुपये उद्योग विभागाने, २५ टक्के रक्कम म्हणजेच १५२ कोटी ३९ लाख रुपये पर्यावरण विभागाने एमआयडीसीला द्यावयाचे आहे. यासाठी १२३.२८ लाख इतकी रक्कम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तज्ज्ञ सल्लागारास प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दिली आहे.

देखभाल व दुरूस्ती असोसिएशनकडेविशेष म्हणजे या निर्णयामुळे उद्योजकांवर कोणताही बोजा पडणार नाही. मात्र, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनानुसार सीईटीपी चालविण्याची संपूर्ण जबाबदारी तसेच याकरीता देखभाल-दुरुस्तीचा खर्च संबंधित औद्योगिक वसाहतीच्या असोसिएशनला करावा लागणार आहे.

राजकीय श्रेयवाद रंगलामहायुती सरकारने एकत्रित निर्णय घेत या तीन प्रकल्पांसाठी ६०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, याबाबत आमदार प्रकाश आवाडे, त्यांचे पुत्र राहुल आवाडे, तसेच खासदार धैर्यशील माने आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने अशा सर्वांकडून या निधी मंजुरीबाबत आपण प्रयत्न केला असल्याची प्रसिद्धीपत्रके काढण्यात आली. त्यामुळे महायुतीअंतर्गत श्रेयवाद रंगल्याची चर्चा पुन्हा झाली.

पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत वेळोवेळी आंदोलने करण्यासह शासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे. प्रत्येक वेळी आश्वासनांखेरीज काहीच मिळाले नाही. शासनाला उशिरा का होईना सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. निधी मंजूर केल्याप्रमाणे कामे मार्गी लावून नदी प्रदूषण लवकरात लवकर रोखावे. - संतोष हत्तीकर, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीriverनदीpollutionप्रदूषण