शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ६० हजार दुकाने बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 10:50 AM

CoronaVirus Kolhapur : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शनिवार (दि. १५) पासून लागू होणाऱ्या आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील सुमारे ६० हजार व्यापारी, व्यावसायिक आपली दुकाने बंद ठेवून सहभागी होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत. राज्य शासनाने अनुदान स्वरूपात व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांना दिले आहे, अशी माहिती कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.

ठळक मुद्देव्यापारी, व्यावसायिकांना अनुदान देण्याची मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांना कोल्हापूर चेंबरचे निवेदन

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शनिवार (दि. १५) पासून लागू होणाऱ्या आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील सुमारे ६० हजार व्यापारी, व्यावसायिक आपली दुकाने बंद ठेवून सहभागी होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत. राज्य शासनाने अनुदान स्वरूपात व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांना दिले आहे, अशी माहिती कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.गुढीपाडवा, अक्षय तृतीया, लग्नसराईमुळे व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापनांत आधीच माल भरून ठेवला आहे. आता लॉकडाऊनमुळे त्यांचे नुकसान झाले आहे. या हंगामात एकूण ४० टक्के व्यवसाय होतो. गेल्यावर्षीही लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले. सामाजिक बांधीलकी जपत व्यापारी, व्यावसायिक हे गरजूंना मदत करत आहेत. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांना उभारी देण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोताप्रमाणे शासनाने अनुदान द्यावे.

तीन महिन्यांतील कर्जाचे व्याज माफ व्हावे. पूर्ण वर्षाचा व्यवसाय कर माफ करावा. विजेचे दर कमी करावेत. सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत बँका सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे केल्या असल्याचे संजय शेटे यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूर चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने, सचिव धनंजय दुग्गे, आदी उपस्थित होते.दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प होणारनिवेदन दिल्यानंतर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींची बैठक झाली. त्यामध्ये लॉकडाऊनला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील ६० हजार आस्थापना बंद राहणार आहेत. त्यामुळे सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प होणार असल्याची माहिती संजय शेटे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर