आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ६० हजार दुकाने बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 10:50 AM2021-05-14T10:50:26+5:302021-05-14T10:52:22+5:30

CoronaVirus Kolhapur : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शनिवार (दि. १५) पासून लागू होणाऱ्या आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील सुमारे ६० हजार व्यापारी, व्यावसायिक आपली दुकाने बंद ठेवून सहभागी होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत. राज्य शासनाने अनुदान स्वरूपात व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांना दिले आहे, अशी माहिती कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.

60,000 shops will be closed during the eight-day lockdown | आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ६० हजार दुकाने बंद राहणार

कोल्हापुरात व्यापारी, व्यावसायिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील यांना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिले. यावेळी शेजारी आनंद माने, धनंजय दुग्गे उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापारी, व्यावसायिकांना अनुदान देण्याची मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांना कोल्हापूर चेंबरचे निवेदन

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शनिवार (दि. १५) पासून लागू होणाऱ्या आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील सुमारे ६० हजार व्यापारी, व्यावसायिक आपली दुकाने बंद ठेवून सहभागी होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत. राज्य शासनाने अनुदान स्वरूपात व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांना दिले आहे, अशी माहिती कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.

गुढीपाडवा, अक्षय तृतीया, लग्नसराईमुळे व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापनांत आधीच माल भरून ठेवला आहे. आता लॉकडाऊनमुळे त्यांचे नुकसान झाले आहे. या हंगामात एकूण ४० टक्के व्यवसाय होतो. गेल्यावर्षीही लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले. सामाजिक बांधीलकी जपत व्यापारी, व्यावसायिक हे गरजूंना मदत करत आहेत. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांना उभारी देण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोताप्रमाणे शासनाने अनुदान द्यावे.

तीन महिन्यांतील कर्जाचे व्याज माफ व्हावे. पूर्ण वर्षाचा व्यवसाय कर माफ करावा. विजेचे दर कमी करावेत. सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत बँका सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे केल्या असल्याचे संजय शेटे यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूर चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने, सचिव धनंजय दुग्गे, आदी उपस्थित होते.

दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प होणार

निवेदन दिल्यानंतर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींची बैठक झाली. त्यामध्ये लॉकडाऊनला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील ६० हजार आस्थापना बंद राहणार आहेत. त्यामुळे सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प होणार असल्याची माहिती संजय शेटे यांनी दिली.

Web Title: 60,000 shops will be closed during the eight-day lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.