मधमाशांच्या हल्ल्यात ६० ते ७० जण जखमी, आजऱ्यातील रामतीर्थवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 19:40 IST2022-04-16T19:29:15+5:302022-04-16T19:40:11+5:30
आजरा : आजऱ्याजवळील रामतीर्थवरील महादेव मंदिर परिसरात मधमाशांच्या हल्ल्यात ६० ते ७० भाविक जखमी झाले. रामतीर्थवर हनुमान जयंतीनिमित्त आज ...

मधमाशांच्या हल्ल्यात ६० ते ७० जण जखमी, आजऱ्यातील रामतीर्थवरील घटना
आजरा : आजऱ्याजवळील रामतीर्थवरील महादेव मंदिर परिसरात मधमाशांच्या हल्ल्यात ६० ते ७० भाविक जखमी झाले. रामतीर्थवर हनुमान जयंतीनिमित्त आज पिंपळ्या मारुती मंदिराशेजारी महाप्रसाद होता. देवदर्शन व महाप्रसाद घेऊन घरी जात असताना दुपारच्या सुमारास मधमाशांनी अचानक हल्ला केला. जखमींवर आजरा ग्रामीण रूग्णालयासह खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
रामतीर्थवरील महादेव मंदिराशेजारी असणाऱ्या झाडावरील मधमाशांचे पोळे शाळकरी मुलाने दगड मारून उठविले. याची कोणतीही कल्पना महाप्रसादासाठी आलेल्या भाविकांना नव्हती. महाप्रसाद घेऊन घरी जात असताना अचानक माशांनी हल्ला केल्याने सर्वत्र गोंधळ व आरडाओरड सुरू झाली. यात ६० ते ७० भाविक जखमी झाले. जखमींवर आजरा ग्रामीण रूग्णालयासह खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मधमाशांचा हल्ला झाल्याचे समजताच जखमींना पाहण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.