जिल्ह्यात ६० पाकिस्तानी, बनलेत आता कोल्हापुरी; सर्व सिंधी समाजाचे, दीर्घ मुदतीचा व्हिसा असल्याने भारतातच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 13:29 IST2025-04-27T13:29:10+5:302025-04-27T13:29:34+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या ६० पाकिस्तानींना दीर्घ मुदतीचा व्हिसा मिळाला आहे. त्यामुळे त्यांना भारतात राहण्याची मुभा मिळाल्याची माहिती पोलिस अधिकान्यांनी दिली.

60 Pakistanis in the district, now Kolhapuris; All from Sindhi community, will stay in India as they have long-term visas | जिल्ह्यात ६० पाकिस्तानी, बनलेत आता कोल्हापुरी; सर्व सिंधी समाजाचे, दीर्घ मुदतीचा व्हिसा असल्याने भारतातच राहणार

जिल्ह्यात ६० पाकिस्तानी, बनलेत आता कोल्हापुरी; सर्व सिंधी समाजाचे, दीर्घ मुदतीचा व्हिसा असल्याने भारतातच राहणार

कोल्हापूरपहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सर्व पाकिस्तानी व्यक्तींना भारताबाहेर घालविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दीर्घ मुदतीचे व्हिसाधारक आणि दुतावासातील अधिकृत कर्मचारी वगळता इतर सर्वांना भारताबाहेर आवे लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या ६० पाकिस्तानींना दीर्घ मुदतीचा व्हिसा मिळाला आहे. त्यामुळे त्यांना भारतात राहण्याची मुभा मिळाल्याची माहिती पोलिस अधिकान्यांनी दिली.

जिल्ह्यात राहणारे ६० पाकिस्तानी नागरिक हे सर्व सिंधी समाजाचे असून, ते आता कोल्हापुरीच बनले आहेत. यात २८ महिलांचा समावेश आहे. यापैकी पाच महिला लग्न होऊन जिल्ह्यात आल्या आहेत. या सर्वांनाच सरकारकडून दीर्घ मुदतीचा व्हिसा मिळाला आहे. त्याचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. बहुतांश पाकिस्तानी कोल्हापूर शहरासह गांधीनगर आणि इचलकरंजी येथे राहतात. शासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार हे सर्व अधिकृत असल्याने त्यांना देश सोडण्याची गरज नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दीर्घ मुदतीचा व्हिसा असलेले आणि पाकिस्तानी दुतावासात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी वगळता पर्यटन, व्यवसाय, वैद्यकीय उपचार, शिक्षण, संशोधन, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आलेल्या इतरांना देश सोडाला लागणार आहे. कोल्हापुरात सध्या यापैकी एकही पाकिस्तानी नाही.

जिल्ह्यातील पाकिस्तानी नागरिकांना आवश्यक संरक्षण पुरवले असून, कोणताही अनुचित प्रकार पडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमीडे पाटील यांनी दिली.

हालचालींवर नजर

परदेशातून आलेल्या सर्वच नागरिकांच्या हालचालींवर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून नजर असते. त्यांचे फीन कॉलर, सोशल मीडिया अकौंटस, आर्थिक व्यवहारांची वारंवार पडताळणी केली जाते. संशयास्पद हालचाली आवळल्यास कारवाई केली आहे, अहे पोलिसांनी सांगितले. ११४ घरदेशी नागरिकांमधील ६० पाकिस्तानी वगळता इतर ५७ विद्यार्थी सह देशांतील आहेत.

इगोपिया, जांभिया, मॉरिशस, सीरिया प्रत्येकी २ अफगाणिस्तान, बोस्टवाना, नायझेरिया, समाऊथ सुदान, सुदान, जपान, फिजी, लेसीथी, पेरू, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका - प्रत्येकी १

Web Title: 60 Pakistanis in the district, now Kolhapuris; All from Sindhi community, will stay in India as they have long-term visas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.