शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कागलमध्ये ३५७ कोटींचा सर्व्हिस रोडसह ६ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

By विश्वास पाटील | Updated: March 14, 2026 18:38 IST

कोल्हापूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातून जाणाऱ्या ...

कोल्हापूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-४८ (NH-४८) वर ६-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी दिली. यासाठी ३५७.९९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असून उद्योग व मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांनी एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग देणाऱ्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. ३-लेन कॉंक्रीट सर्व्हिस रस्त्यासह ६-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरकोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात राष्ट्रीय महामार्ग-४८ वर दोन्ही बाजूस ३-लेन कॉंक्रीट सर्व्हिस रस्त्यासह ६-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामासाठी ३५७.९९ कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग-४८ हा भारताच्या गोल्डन क्वाड्रिलॅटरल (GQ) महामार्ग नेटवर्कमधील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून तो दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई या प्रमुख शहरांना जोडतो. जलद अन् सुरळीत वाहतूक कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे ५-स्टार एमआयडीसी (MIDC) औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या भागात व्यापार व उद्योग झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असून प्रचंड वाहतूक कोंडी व प्रदूषणातही वाढ होत आहे. याचा परिणाम आपातकालीन सेवांवर देखील होत आहे. एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे लांब अंतराची जलद वाहतूक वेगळी होणार असून स्थानिक वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. यामुळे प्रवासी व मालवाहतुकीसाठी गतीमान व सुरक्षित प्रवास शक्य होईल. तसेच इंधन बचत होऊन प्रवासाचा वेळही कमी होईल. परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या उन्नत महामार्गामुळे या भागातील उत्पादकता वाढेल, आर्थिक सुबत्ता वाढेल व आपातकालीन सेवा कार्यक्षमतेने पुरवता येतील. यामुळे देशांतर्गत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल आणि मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kagal to get elevated corridor, service road; Gadkari approves project.

Web Summary : Kagal, Kolhapur will get a 6-lane elevated corridor with service roads. Nitin Gadkari approved the ₹357.99 crore project to ease traffic, boost industry, and ensure faster transport. The project will improve connectivity and efficiency.