गडहिंग्लज : कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात अवैधरित्या साठा करून ठेवलेला ६ लाख ३९ हजार रुपये किमतीचा देशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून जप्त केला.शहरातील काळभैरीरोडवरील एका चाळीत शुक्रवारी (२३) रात्री उशिरा हीकारवाई केली. याप्रकरणी अंकुश सुरेश भोसले (रा.औरनाळ,ता.गडहिंग्लज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी, शहरातील काळभैरी रोडवरील एका चाळीत देशी दारूचा अवैध साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार हा छापा टाकण्यात आला. छाप्यात ६ लाख ३९ हजार रुपये किमतीच्या मद्याच्या १२ हजार ६०० बाटल्या जप्त करण्यात आल्या.उपायुक्त वाय.एम.पोवार, अधीक्षक संध्याराणी देशमुख, उपअधीक्षक बी.आर.चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम.एस.गरूड, दुय्यम निरीक्षक जी.एन.गुरव, ए.बी.वाघमारे, एस.आर.ठोंबरे यांनी ही कारवाई केली आहे.
गडहिंग्लजमध्ये ६ लाखांचा देशी मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 11:51 IST
CoronaVirus LiquerBan Kolhapur : कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात अवैधरित्या साठा करून ठेवलेला ६ लाख ३९ हजार रुपये किमतीचा देशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून जप्त केला.शहरातील काळभैरीरोडवरील एका चाळीत शुक्रवारी (२३) रात्री उशिरा ही कारवाई केली. याप्रकरणी अंकुश सुरेश भोसले (रा.औरनाळ,ता.गडहिंग्लज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गडहिंग्लजमध्ये ६ लाखांचा देशी मद्यसाठा जप्त
ठळक मुद्देगडहिंग्लजमध्ये ६ लाखांचा देशी मद्यसाठा जप्त राज्य उत्पादनची कारवाई : अौरनाळच्या एकावर गुन्हा